ETV Bharat / state

महायात्रा काळात सिद्धेश्वर मंदिर राहाणार बंद, भाविकांची दर्शनासाठी गर्दी - Solapur Latest News

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांची महायात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. लाखो भाविक या महायात्रेत सहभागी होतात. यंदा मात्र महायात्रेला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून विभागीय आयुक्तांनी फक्त 50 भाविक व मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पाडावा असा आदेश दिला आहे.

भाविकांची दर्शनासाठी गर्दी
भाविकांची दर्शनासाठी गर्दी
author img

By

Published : Jan 10, 2021, 7:21 PM IST

सोलापूर- सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांची महायात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते. लाखो भाविक या महायात्रेत सहभागी होतात. यंदा मात्र महायात्रेला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, म्हणून विभागीय आयुक्तांनी फक्त 50 भाविक व मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी पार पाडावा असा आदेश दिला आहे. तसेच माहायात्रा काळात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. महायात्रा काळात 12 जानेवारीपासून 5 दिवस दर्शनासाठी मंदिर बंद राहाणार असल्याने, रविवारी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.

शेटे वाड्यात योग दंडाची पूजा करून सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात

शेकडो वर्षापासून शेटे वाड्यात योग दंडाची पूजा करून, सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात होते. आज रविवारी योग दंडाची पूजा करून महायात्रेला सुरुवात झाली आहे. काही मोजके भाविक शासन नियम पाळून शेटे वाड्यात योग दंडाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.

सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

दरवर्षी महायात्रा काळात आंध्र प्रदेश, कर्नाटकमधून येतात भाविक

दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिरात येतात. महायात्रा काळात, अक्षता सोहळ्यात तर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून हजारो भाविक सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी दाखल होतात. मात्र यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे. 12 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मंदिर परिसरात जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.