ETV Bharat / state

बँकाना आले जत्रेचे रुप, जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांची तोबा गर्दी - bank of india news

संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी कामगार वर्गाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यांच्या दररोजच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान यांनी महिलांच्या जनधन खात्यावर प्रत्येक महिन्याला 500 रूपये प्रमाणे पैसे जमा केले आहेत. ते काढण्यासाठी अनेकांनी बँकांसमोर गर्दी केली होती.

बँकांसमोर पडलेली गर्दी
बँकांसमोर पडलेली गर्दी
author img

By

Published : Apr 4, 2020, 6:11 PM IST

सोलापूर - शहरातील बँकांसमोर एखाद्या जत्रेपेक्षाही जास्त गर्दी झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले. जनधन खात्यावर जमा झालेले पैसे काढण्यासाठी महिलांनी बँकांच्या समोर तोबा गर्दी केली होती. सध्या संचारबंदी लागू असली तरी बॅंकेत जमा झालेले 500 रुपये काढण्यासाठी हजारो महिलांनी बँकेसमोर गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घरातच राहून कोरोना रोगापासून मूक्त रहाण्याचा सल्ला देशाच्या पंतप्रधानापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण देत आहेत. घरात बसून तसेच एकमेकांपासून दूर राहूनच आपण कोरोनापासून दूर राहू शकतो असे सगळीकडे सांगितले जात असताना सोलापुरात मात्र याच्या विरूद्ध परिस्थिती आज पहायला मिळाली.

संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकरी कामगार वर्गाची मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यांच्या दररोजच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत देशाचे पंतप्रधान यांनी महिलांच्या जनधन खात्यावर प्रत्येक महिन्याला 500 रूपये प्रमाणे पैसे जमा केले आहेत.

महिलांच्या जनधन खात्यावर 500 रूपये जमा झाल्याचे समजताच आज सोलापुरातील कामगार, कष्टकरी महिलांनी बॅंकेच्या समोर तोबा गर्दी केली होती. सात रस्ता परिसरातील बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांसमोर हजारो महिलांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग पाळा, असे सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्रातील बँकांसमोर जत्रेतील गर्दीपेक्षाही दाटीवाटीची गर्दी पहायला मिळाली. ज्या कष्टकरी कामगारांचे पोटच हातावर त्यांच्यासाठी बँकेत जमा झालेले अवघे 500 रूपये देखील किती महत्वाचे आहेत. हे या गर्दीवरून स्पष्ट होते. तसेच कोरोनामुळे झालेल्या संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाची काय अवस्था आहे याची साक्षच ही गर्दी देत आहे.

हेही वाचा - सोलापूर : शासकीय रुग्णालयात आणखी 5 व्हेटिंलेटर दाखल होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.