ETV Bharat / state

शेतकऱ्यांना दिलासा : सोलापूर जिल्हा बँकेकडून 1 ऑक्टोबरपर्यंत पीककर्जास मुदतवाढ

author img

By

Published : Sep 20, 2020, 3:44 PM IST

जिल्ह्यामध्ये 1 हजार 264 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून त्यापैकी नवीन धोरणानुसार पीककर्ज वाटपास 334 संस्था पात्र आहेत. तर, उर्वरित संस्थानी बँक पातळीवर 100 टक्के वसुली व संस्था पातळीवर 50 टक्के वसुली केल्यास त्याही संस्था नवीन धोरणानुसार पीककर्ज वाटपास पात्र होणार आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा
शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने 1 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांना अल्पमुदतीच्या पीक कर्जवाटपास मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून ज्या शेतकरी सभासदांनी अल्पमुदत पीककर्जाची बाकी पूर्णत: भरली आहे, त्याच सभासदांना पुन्हा पीककर्ज देण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे. या धोरणानुसार 1 ऑक्‍टोबरपासून शेतकऱ्यांना अल्पमुदत पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे.

सोलापूर बँकेकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने कर वसूल करतात. अशा संस्थांमार्फत कर्जवाटपाचे धोरण राबविले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 1 हजार 264 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था असून त्यापैकी नवीन धोरणानुसार पीककर्ज वाटपास 334 संस्था पात्र आहेत. तर, उर्वरित संस्थांची 30 जून अखेर बँक पातळीवरील कर्जाची वसुली शंभर टक्के व संस्था पातळीवरील सभासद कर्जाची वसुली 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे, अशा संस्था पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तफावतीमध्ये व नफ्यामध्ये सोसायट्यांच्या सभासदांना अल्पमुदत पीककर्ज वाटप केले जाणार आहे. नवीन धोरणानुसार जिरायती पिकासाठी अल्पमुदत कमाल कर्ज मर्यादा 25 हजार रुपये, संपूर्ण बागायती क्षेत्रासाठी अल्पमुदत कमाल कर्जाची मर्यादा 1 लाख रुपये, जिरायत व बागायत पीक कर्जासाठी एकत्रित कमाल कर्ज मर्यादा 1 लाख रुपये इतकी असणार आहे.

हेही वाचा - भीमा नदी दुथडी वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा, जुना दगडी पूल पाण्याखाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.