ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक

author img

By

Published : Apr 26, 2021, 10:52 PM IST

जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा तालुक्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. चार तालुक्यांमध्ये सुमारे सहा हजारच्या आसपास रुग्णही उपचार घेत आहेत. पंढरपूर तालुक्या पाठोपाठ माळशिरस तालुका हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे.

कोरोना परिस्थिती सोलापूर
कोरोना परिस्थिती सोलापूर

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत आहे. आज (सोमवारी) कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोबतच मृत्यूचे तांडवही पहायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यात आज (सोमवारी) दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यात गेल्या 24 तासांत 299 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तालुक्यातील ४५० कोरोना रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. माढा, माळशिरस, करमाळा, मंगळवेढा तालुक्यात कोरोना चिंताजनक होताना दिसत आहे. जिल्ह्यातून 891जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 तालुक्यात 10 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या 10 हजार 451 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

या तालुक्याची परिस्थिती चिंताजनक

जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा तालुक्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. चार तालुक्यांमध्ये सुमारे सहा हजारच्या आसपास रुग्णही उपचार घेत आहेत. पंढरपूर तालुक्या पाठोपाठ माळशिरस तालुका हा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दोन हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याबरोबरच माढा तालुक्यामध्ये अठराशे रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार दिले जात आहेत. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यामध्ये पोट निवडणुकीनंतर कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये 2700 च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहे. पंढरपूर तालुक्‍यात सुमारे 450 जणांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनासमोर कोरोना साखळी तोडण्याचे मोठे आव्हान असणार आहे.त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ ग्रामीण भागाला बसताना दिसत आहे. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीमध्ये नेत्यांच्या सभेला गर्दी होणारी ही ग्रामीण भागातील होती. त्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर माळशिरस, सांगोला माढा करमाळा या तालुक्यात ग्रामीण भागापर्यंत कोरोनाने आपले हात-पाय पसरले आहेत. आज (सोमवारी) आलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागात 1104 रुग्ण नवीन बाधित झाले आहेत. तर शहरी भागांमध्ये 204 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातूनच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून येते. शिवाय ग्रामीण भागात मृत्यूदरही जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.