ETV Bharat / state

सोलापूर : अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच आरोपी अटकेत - सोलापूर गुन्हे वार्ता

अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 लाख 77 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

crime branch raid gambling place in akkalkot in solapur
सोलापूर : अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा; पाच आरोपी अटकेत
author img

By

Published : Dec 6, 2020, 7:12 PM IST

अक्कलकोट (सोलापूर) - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. गोपाळ गणेश तलवार (35), कुमार अडवेअप्पा मेडकुंदी (26), नामदेव पांडू राठोड (40), जगदीश बाबुराव कष्टगी (32), शरनप्पा अमृत माळी (30), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी नामदेव पांडू राठोड (40) हा आरोपी जुगार अड्ड्याचा चालक असून तो सोलापूरचा रहिवासी आहे. तर उर्वरित आरोपी हे कर्नाटक येथील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 लाख 77 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुधनी शिवारातील गतिमंद शाळेजवळ सुरू होता जुगार अड्डा -

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दुधनी शिवारातील गतिमंद शाळेजवळील परिसरात एका दुसऱ्या गुन्ह्याचा तपासासाठी गेले होते. यावेळी त्यांना या भागात जुगार अड्ड्या सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना बघताच सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

हेही वचा - महिलेला समाजातून बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या सात पंचांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.