ETV Bharat / state

चिंचणी गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी; पशू-पक्षांना त्रास होऊ नये यासाठी घेतला निर्णय

फटाक्यांमुळे पशू पक्षांना त्रास होईल ही गोष्ट ध्यानी ठेवून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावातील ग्रामस्थांनी यावर्षी फटके विरहीत दिवाळी साजरी केली.

चिंचणी गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी
author img

By

Published : Oct 30, 2019, 8:03 PM IST

सोलापूर - दिवाळीच्या सणात फटक्याची आतिषबाजी होते. यातून लोकांना जरी आनंद मिळत असला तरी मुक्या जनावरांवर त्याचा परिणाम होतो. हीच गोष्ट ध्यानात ठेवून पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गावातील ग्रामस्थांनी यंदा फटके विरहित दिवाळी साजरी केली आहे.

प्रतिक्रिया देताना गावातील विद्यार्थी

यंदाच्या दिवाळीत चिंचणी गावात एकही फटका फोडण्यात आला नाही. फटाके न फोडता या संपूर्ण गावाने दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे, गावातील चिमुकल्यांनी देखील गावात फटाके न फोडण्याच्या निर्णयाचे स्वागत करत फटाके विरहीत दिवाळी साजरी केली. चिंचणी गावात काही वर्षापूर्वी फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव कुत्र्यांसह पक्षांचा मृत्यू झाला होता. दिवाळीच्या काळात सलग चार ते पाच दिवस फटाके फूटत असल्यामुळे दुभती जनावरे भेदरली आणि त्यामुळे काही जनावरांनी दूध द्यायचे बंद केले होते. त्याचबरोबर, शेळ्या देखील भेदरून गेल्याचे विदारक चित्र गावातील गावकऱ्यांना पाहायला मिळाले होते.

दिवाळीच्या सणात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे पाळिव प्राण्यांबरोबरच पशू-पक्षांवर विपरीत परिणाम होतो याची जाणीव ग्रामस्थांना झाली. त्यामुळे यापुढे दिवाळीच्या सणात गावात एकही फटाका वाजवायचा नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत चिंचणी या गावात एकही फटाका वाजला नाही.

मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायालयाने मोठे फटाके फोडण्यावर बंदी घातली असली तरी सर्रासपणे अशी फटाके फोडल्या जात असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. मात्र, दिवाळीच्या काळात आपल्या काही क्षणांच्या आनंदासाठी गाव शिवारातील पशू-पक्षांना त्रास होतो. त्यामुळे पशू पक्षांना होणारा त्रास थांबविण्यासाठी चिंचणी गावातील लोकांनी फटाके न फोडण्याचे पाऊल उचलले. त्यांचे हे पाऊल संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श निर्माण करणारे आहे.

हेही वाचा- दिवाळी विशेष : पंढरपुरात साकारली म्हैसुर पॅलेसची प्रतिकृती

Intro:mh_sol_01_fatake_free_diwali_7201168
फटाके न उडविणार आदर्श गाव,
पशू-पक्षी व जनावरांसाठी चिमूकल्यांनीही केली फटाकेमुक्त दिवाळी साजरी
सोलापूर-
दिवाळीचा सण म्हटले की फटाक्याची आतिषबाजी हे नित्याचीच आहे. त्यातही लहान मुल मूली हे फटाक्यांसाठी नेहमीच आग्रही राहत असल्याचे आपण सर्वजण अनूभवतो मात्र सोलापूर जिल्ह्यात अंसही एक गाव आहे. ज्या गावानं संपूर्ण दिवाळीत एकही फटाका न वाजवता प्रदुर्षण मुक्त दिवाळी साजरी केली आहे. Body:पंढरपूर तालूक्यातील चिंचणी हे गाव. या गावानं यंदाच्या दिवाळीत एकही फटका फोडलेला नाही. फटाके न फोडता या संपूर्ण गावानं दिवाळी साजरी केली आहे. विशेष म्हणजे या गावातील चिमूकल्यांनी देखील गावात फटाके न फोडण्याच्या निर्णयाच स्वागत करत फटाके फोडायचे नाहीत असा निर्णय घेऊन फटाके विरहीत दिवाळी साजरी केली आहे.
चिंचणी गावात काही वर्षापूर्वी फटाक्यांच्या आवाजामुळे पाळीव कूत्र्यांसह पक्षांचा मृत्यू झाला होता. दिवाळीच्या काळात सलग चार ते पाच दिवस फटाके फूटत असल्यामुळे दूध, दूभती जनावंर भेदरली आणि काही जनावरांनी दूध द्यायचं बंद केलं होते. तसेच शेळ्या देखील भेदरून गेल्याचे विदारक चित्र गावातील गावकऱ्यांना पहायला मिळाले होते.
दिवाळीच्या सणांत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यामुळे पाळीव प्राण्यांसोबतच पशू-पक्षांवर किती विपरीत परिणाम होतो याची जाणीव झाल्यामुळे चिंचणी या गावातील गावकऱ्यांनी यापूढे दिवाळीच्या सणांत गावात एकही फटाका वाजवायचा नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे या वर्षीच्या दिवाळीतही चिंचणी या गावात एकही फटाका वाजलेला नाही.
मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यावर न्यायालयाने बंदी घातलेली आहे. न्यायालयाने मोठे फटाके फोडण्यावर बंदी घातली असली तरी सर्रास पणे मोठ्या आवाजाचे फटाके उडविण्यात येत असल्याचे चित्र सगळीकडे पहायला मिळते. मात्र पंढरपूर तालूक्यातील चिंचणी गावातील गावकऱ्यांनी या गावात फटाके वाजवायचे नाहीत असा निर्णय घेतला.
गावातील मोठ्या लोकांनी फटाके न वाजविण्याचा निर्णय घेतला असला तरी लहान चिमूकल्यांची मात्र फटाके वाजविण्याची मोठी हौस असते. या गोष्टीवर मार्ग काढतांना गावातील ज्येष्ठांनी फटाक्याचे दूष्परिणाम हे लहान मूलांना समजावून सांगितले आणि फटाके फोडायचे की नाही याचा निर्णय लहान मुलांनीच घ्यावा असे सांगत फटाके फोडण्याचा निर्णय हा सर्वस्वी लहान मूलांवर सोपविण्यात आला.
चिंचणी या गावातील लहान मुलांनी देखील पशू-पक्षी आणि पाळीव प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी या दिवाळीत कोणीही लहान मूलगा हा फटाके वाजविणार नाही असा निर्णय घेतला आणि फटाकेमूक्त प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय लहान मुलांनी देखील घेतला.

दिवाळीत वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यामुळे शेळ्या, जनांवरे, कुत्रे,मांजर, गायी, बैल, म्हशी काही खात नाहीत. पाणी पित नाहीत भेदरून जातात. पशू-पक्षी गाव, शिवार सोडून जातात . दिवाळीच्या काळातील आपल्या काही क्षणाच्या आनंदासाठी गावशिवारातील पशू-पक्षांना त्रास होतो. पशूपक्षांना होणारा त्रास थांबविण्यासाठी चिंचणी या गावांने उचलेले पाऊल हे संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आणि आदर्श असे आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.