पंढरपूर - जालना जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी आलेल्या मजूर जोडप्याचा कंटेनरने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. रामदास दत्तू गायकवाड आणि पत्नी मीरा रामदास गायकवाड (रा. कैकाडी मोहल्ला जालना) अशी मृतांची नावे आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिमानगर येथे रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
घरी परतताना काळाचा घाला
रामदास गायकवाड व त्याची पत्नी मीरा हे इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे ऊस तोडणीचे काम केले. उसाचा ट्रॅक्टर भरून देऊन ते दोघे रविवारी रात्री उशिरा मोटारसायकलवरून मुक्कामासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील नगर येथील सरदारजी ढाब्यासमोर मागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास गायकवाड हा जागीच ठार झाला तर त्याची पत्नी मीराचा इंदापूर येथे उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला.
प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सुरेश मधुकर भोसले (रा. डोंगरगांव, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. कंटेनर चालकाविरुद्ध टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.