सोलापूर - कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू आहे. सर्व शाळाही बंद असल्याने विद्यार्थ्यांनाही सुटी मिळाली आहे. पण, सुटीच्या काळात घराबाहेर खेळताही येत नसल्याने विद्यार्थी कंटाळून गेले. मात्र, अशा काळात घरी बसून माढ्यातील दोघा भावंडांनी कोरोना गीत तयार केले आहे. प्रणव व समर सोमनाथ शिंदे अशी त्या दोघांची नावे आहेत.
माढ्याच्या जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये प्रणव तर कचरे वस्ती प्राथमिक शाळेत चौथीत समर शिकतो. दोघांचे वडील सोमनाथ शिंदे हे जिल्हा परिषद शाळे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी सुटीच्या काळात कोरोना विषयी एक गीत तयार केले. त्यानंतर प्रणव व समरला गाण्यास दिले. या दोघांनी तबला, हार्मोनियमच्या साथीने संगीतबद्ध करून गायन केले.
सर्वांच्या प्रयत्नाने आपण कोरोनाचा कसा मुकाबला करत आहे. हे गीतातून मांडण्यात आले आहे. या सध्याच्या परिस्थितीत लहान शाळकरी विद्यार्थ्यांना घरात बसून कसे कंटाळवाणे होते. त्यांच्या काय भावना आहेत यांचे चित्रण तसेच कोरोनाबाबतची घ्यायची काळजी, याबाबत जागृती गीतातून करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीवर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
हेही वाचा - Coronavirus : शिवभोजनालय केंद्र सुरु करा - जिल्हाधिकारी शंभरकर