ETV Bharat / state

सोलापूर शहराची हद्दवाढ केलेल्या भागात कोरोनाचा रुग्ण; प्रशासनाकडून परिसर सील - सोलापूर शहर बाळे गावात कोरोनाचा रुग्ण

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना सोलापूरकरांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. शहराच्या हद्दीतील बाळे गावात कोरोनाचा रुग्ण आढल्याने खळबळ उडाली आहे.

Corona patient in Bale village in Solapur city news
सोलापूर शहर हद्दीतील बाळे गावात कोरोनाचा रुग्ण
author img

By

Published : May 1, 2020, 4:24 PM IST

सोलापूर - शहराच्या हद्दवाढ भागातील बाळे गावात कोरोनाचा रुग्ण आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील संतोष नगर परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. परिसर सील करण्यात आल्याने या भागात जाण्यासाठी किंवा नागरिकांना येथून बाहेर जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

सोलापूर शहर हद्दीतील बाळे गावात कोरोनाचा रुग्ण... प्रशासनाकडून संतोषनगर परसर सील

हेही वाचा... 'जय महाराष्ट्र..!' सचिन तेंडुलकरने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

बाळे हे गाव सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यावर महापालिका हद्दीत समाविष्ट झाले. बाळे गावातील संतोष नगर परिसरातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा परिसर आज सकाळी पोलिसांनी सील केला. एकीकडे सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यातच या नव्या बातमीने सोलापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.