ETV Bharat / state

मोदी सरकार म्हणजे देशाला लागलेली साडेसाती; सोलापुरात मोदी सरकारचा निषेध - प्रकाश वाले

रविवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन पार पडले. केंद्रातील मोदी सरकारला 30 मे 2021 रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात वर्षातील अपयशी कारभाराचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

निषेध आंदोलन
निषेध आंदोलन
author img

By

Published : May 30, 2021, 7:03 PM IST

सोलापूर - केंद्रातील मोदी सरकारला 30 मे 2021 रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. या सात वर्षातील अपयशी कारभाराचा काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. मोदी सरकार म्हणजे देशाला लागलेली साडेसाती आहे, अशी बोचरी देखील करण्यात आली. रविवारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन पार पडले. या आंदोलनावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आंदोलकांना काँग्रेस भवनच्या बाहेर येऊ दिले नाही.

सोलापुरात काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था कोलमडली -

शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तसेच 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेला अच्छे दिन आणि विकासाची खोटी स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. पण या सात वर्षाच्या कालावधीत एकाही जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यात आला नाही, असा आरोप यावेळी त्यांनी केला.

पाकिस्तानला लसी दिल्या -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात लाखोंच्या संख्येने मृत्यू झाले आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी भारतात लसीकरण महत्वाचे होते. मात्र भारतात लसींचा तुटवडा असताना मोदी सरकारने भारतात उत्पादन झालेल्या लसी पाकिस्तानात पाठविल्या. मोदी सरकार म्हणजे देशाला लागलेली साडेसाती, अशी टीका निषेध आंदोलनमध्ये करण्यात आली. निषेध आंदोलनात विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, परवीन इनामदार, हेमा चिंचोळकर, अलका राठोड, नलिनी चंदेले, तिरूपती परकीपांडला, अरुण साठे, अशोक कलशेट्टी, सुमन जाधवसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.