ETV Bharat / state

Pandharpur Curfew : अधिकारी, व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ; व्यापारी आंदोलनावर ठाम

कोरोना साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली आहे.

pandharpur
अधिकारी व व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:27 PM IST

Updated : Aug 11, 2021, 6:28 PM IST

पंढरपूर - शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला व्यापारी महासंघाकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकारी व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. पंढरपुरातील व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासमोर मांडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले.

पंढरपुरातील संचारबंदीवरून अधिकारी व व्यापाऱ्यांमधील बैठकीत गोंधळ
  • पंढरपुरात 13 ऑगस्टपासून संचारबंदी -

कोरोना साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यात जिल्हा प्रशासनाकडून 13 ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली आहे. कोरोनामुळे पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. त्यातून आता पंढरपुरात होणाऱ्या संचारबंदीला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रेटही कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीबाबत फेरविचार करावा. अन्यथा 13 ऑगस्टपासून दुकाने उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला. मात्र, अधिकारी व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे

प्रतिक्रिया देताना अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यापारी
  • अप्पर जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींची बैठक निष्फळ -

अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, या चर्चेमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. अप्पर जिल्हाधिकारी व व्यापारी प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीबाबत योग्य ती भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांच्या भावना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले. याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले आहे.

हेही वाचा - संचारबंदीला तीव्र विरोध : पंढरपुरात व्यापारी महासंघाचे अर्धनग्न आंदोलन

Last Updated : Aug 11, 2021, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.