ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणूक नाट्यमय; महाविकास आघाडीत फुट तर भाजपात उमेदवारीवरून रस्सीखेच

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार ठरवला आहे. मात्र त्या उमेदवाराची उमेदवारी काँग्रेस व शिवसेनेच्या कात्रीमध्ये अडकल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून कुटुंबातील उमेदवारीबाबत दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके व सुपुत्र भालके यांच्या मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत शंका आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक, पंढरपूर पोटनिवडणुकीतील उमेदवार, पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार,  Pandharpur by elections,  no candidate declared for Pandharpur by elections
पंढरपूर पोटनिवडणुकीत इच्छूक उमेदवार
author img

By

Published : Mar 26, 2021, 11:57 AM IST

पंढरपूर - मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी व भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या गेल्या. मात्र अद्यापही पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे चर्चासत्र सुरू आहेत. भाजपाकडून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पंढरपुरातील पोटनिवडणुकीतील चित्र वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची उमेदवारी काँग्रेस व शिवसेनेच्या कात्रीमध्ये -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार ठरवला आहे. मात्र त्या उमेदवाराची उमेदवारी काँग्रेस व शिवसेनेच्या कात्रीमध्ये अडकल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीकडून कुटुंबातील उमेदवारीबाबत दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके व सुपुत्र भालके यांच्या मध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत शंका आहे. विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके यांनी प्रचाराचा धडाका लावला. भगीरथ भालके 17 एप्रिलला आपल्याला मतदान करा, असे आवाहन करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर दौऱ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार हा तुमच्या मनातील असणार असल्याचे सांगितले. मात्र भगीरथ भालके की जयश्री भालके यांच्या नावांची घोषणाही अद्याप झालेली नाही.

स्वाभिमानी, काँग्रेस व एमआयएम पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार -
पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी 23 मार्च रोजी पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनी स्वाभिमानीचे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर शिवसेना महिला जिल्हा अध्यक्ष शैला गोडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र शैला गोडसे आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे नेते नितीन नागणे यांनी पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. तिन्ही पक्षांकडून मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या अशा पवित्र्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर पडली आहे. एमआयएम पक्षानेही पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मुस्लिम मतांचा फटका राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता आहे.

भाजपात उमेदवारीवरून परिचारक व अवताडे यांच्यात रस्सीखेच -
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये आमदार प्रशांत परिचारक यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे. मात्र सध्याच्य पोटनिवडणुकीमध्ये भाजपाकडून माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, अभिजीत पाटील व डॉक्टर बीपी रोंगे यांनी उमेदवारीसाठी मागणी केली आहे. यातील माजी मंत्री राम शिंदे, अभिजीत पाटील, डॉक्टर बीपी रोंगे यांच नावे मागे पडल्याचे दिसून येत आहे. आमदार प्रशांत परिचारक व दामाजी शुगर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्यात उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपासाठी पंढरपुर पोटनिवडणूक महत्वाचे आहे. त्यामुळे भाजपकडून दोघांपैकी एक जणांनी निवडणूक लढवावी, असे आदेश दिल्या आहेत. तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्या उमेदवारीवर जोर दिला आहे. त्यामुळे समाधान आवताडे यांचा उमेदवारीचा मार्गही मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - यापुढे चुकीला माफी नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.