ETV Bharat / state

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचा दणका; 'या' कारणाने अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचे केलं निलंबन - सोलापूर महानगरपालिका न्यूज

सोलापूर महानगरपालिकेच्या गवसु (गलिच्छ वस्ती सुधारणा) विभागातील एक अधिकारी व एका कर्मचाऱ्यास पालिका आयुक्तांनी निलंबित केले आहे. शहरातील मधोमध असणाऱ्या महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच अतिक्रमण केलेल्या कडून टॅक्स वसुली करणे, असा आरोप ठेवून ही कारवाई झाली आहे.

Commissioner p shivshankar suspends 2 SMC employees
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचा दणका; 'या' कारणाने अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचे केलं निलंबन
author img

By

Published : Nov 4, 2020, 9:15 AM IST

सोलापूर - गवसु (गलिच्छ वस्ती सुधारणा) विभागातील आकारणी व वसुली अधिकारी माणिकप्रभु लक्ष्मण फुले आणि लिपिक संजय शिवरुद्रप्पा सावळगी यांनी अधिकाराचा गैरवापर केला. त्यामूळे त्यांच्यावर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी निलंबनाची कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण -

शहरातील कोनापूरे चाळ या भागातील मनपाच्या मालकीच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करुन घातलेल्या झोपड्यांची वरिष्ठांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता तसेच गवसु (तांत्रिक) विभागाचा अभिप्राय न घेता फुले यांनी आकारणी केली आहे. आरक्षित जागेवर असलेल्या झोपड्यावर कराची आकारणी करुन अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिले. नागरीकांच्या रोषास सामोरे जाण्यास प्रशासनाला भाग पाडले. तसेच त्यांनी भगवान नगर घरकुल योजनेतील 298 लाभार्थ्यांच्या मिळकतीची आकारणी व ज्यांनी खाजगी नळ घेतले आहेत, अशा मिळकतदारांना पाणीपट्टीची आकारणी केली नाही. त्यामुळे फुले माणिकप्रभु लक्ष्मण यांना त्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे सेवेतून तत्काळ निलंबित केले.

महापालिकेत खळबळ

गवसु विभागाकडील लिपिक संजय शिवरुद्रप्पा सावळगी यांनी देखील उपरोक्त प्रमाणे आकारणी केली. तसेच आरक्षित असलेल्या जागेवरील झोपड्यांची आकारणी केल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यांना देखील महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) 1979 मधील तरतूदींचा भंग केल्याने मंगळवारी सेवेतून तत्काळ निलंबित केले. या कारवाईमुळे सोलापूर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - पंढरपुरात कंटेनरच्या धडकेत जालन्यातील ऊसतोडणी करणारे दाम्पत्य ठार

हेही वाचा - पत्नीसह सासरच्या मंडळींनी पोटगीचा तगादा लावल्याने पतीची आत्महत्या, मृत्यूपूर्वी केलेले मेसेज व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.