ETV Bharat / state

शहरातील 40 हजारापेक्षा जास्त ज्येष्ठांवर प्रशासनाचे लक्ष - जिल्हाधिकारी

शहरात सुमारे 50 हजार व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना कोणता ना कोणता आजार आहे. या ज्येष्ठ नागरिकांवरच जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Old
प्रशासनाने विलगीकरणाची केलेली तयारी
author img

By

Published : May 17, 2020, 1:17 PM IST

सोलापूर - शहरात आतापर्यंत जे मृत्यू झाले आहेत, ते सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आहेत. त्यामुळे पुढील काळात सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर शहरात सुमारे 50 हजार व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना कोणता ना कोणता आजार आहे. या ज्येष्ठ नागरिकांवरच जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. 40 हजार पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची माहिती ही सोलापूर महापालिकेला देण्यात आलेली आहे. सोलापूर शहरातील 314 रेशन दुकानाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 15 हजारापेक्षा जास्त लोक हे 55 वर्षावरील आहेत. तसेच विडी कामगारांच्या रूग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील विडी कामगारांमध्ये देखील 12 हजार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना वेगवेगळे आजार आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीमध्ये देखील ज्येष्ठ नागरिक आणि त्यांना असलेले आजार या संबंधीची माहिती एकत्रीत करून ती महापालिकेला देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर

महापालिकेला दिलेल्या माहितीनंतर या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून या ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सोलापूर शहरात कोरोनाची जी संख्या वाढत आहे, ती संख्या आजार लपवल्याने तसेच वेळीच उपचार न घेतल्याने वाढत आहे.

महापालिकेच्या यंत्रणेकडून जो सर्वे झाला आहे, त्या सर्वेक्षणात देखील सोलापूरकर योग्य ती आणि खरी माहिती देत नसल्यामुळे कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर लक्ष ठेवणे तसेच वेळप्रसंगी त्यांना वेगळे ठेवण्याची तयारी देखील महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.