ETV Bharat / state

पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणीचे आदेश

कोरोना विषाणू रोखण्यासाठी पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांची रॅपिड ‌अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्या घरीच उपचार करण्याची सोय केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मानोरकर यांनी दिली.

meeting of traders with chief officer
मुख्यांधिकाऱ्यांसोबत व्यापाऱ्यांची बैठक
author img

By

Published : Sep 9, 2020, 9:44 PM IST

पंढरपूर- शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, शहरातील सर्व व्यापाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिली.

पंढरपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते. पंढरपुरात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू लागला आहे. नगरपालिकेने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व व्यापारी आणि दुकानदारांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे.

हेही वाचा-शेतातील मुरूम व दगड उत्खनन करण्याऱ्या कंपनी विरोधात काँग्रेससह शेतकऱ्यांचा रास्ता रोको

कोरोना चाचणी केल्यानंतर काही व्यापारी तसेच दुकानातील कामगार, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास अशा रुग्णांना त्यांच्या घरी उपचार करण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अशी सोय नाही, अशा रुग्णांना नगरपरिषदेच्या 65 एकर येथील कोविड केअर सेंटर अथवा एमआयटी कॉलेज येथे उपचाराची सोय केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी मानोरकर यांनी दिली.

बैठकीला शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पद्मकुमार गांधी, विजय कुमार परदेशी, शैलेंद्र बजाज, गोविंद गाडे, अजित सावळे, राजगोपाल भट्टड, सचिन म्हमाणे, राजकुमार गांधी, राहुल मोहिते, रवींद्र वांगीकर, जयसिंग भालके, महेश गानमोटे, नगरसेवक संजय निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डांगे, नवनाथ रानगट आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.