ETV Bharat / state

महिलांवरील अत्याचार प्रकरणात तातडीने कारवाई करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश - CM in solapur

महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करावे. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश दिले.

Cm uddhav thakare
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 11, 2019, 3:58 AM IST

सोलापूर - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करावे. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश दिले.

गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडामधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा तत्काळ कशा पद्धतीने विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता शासनाकडून करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

Intro:सोलापूर : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल,मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.Body:महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.महिलांवरील अत्याचारुबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत,असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.Conclusion:गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंडामधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील.आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा विश्वास ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.