सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोटचा समावेश कर्नाटकमध्ये करण्याबाबत विधान केले आहे. तर या दोन्ही शहरांबाबत अधिक माहिती पाहू, सोलापूर हे महाराष्ट्रातील ५ वे मोठे शहर असून ते पश्चिम महाराष्ट्र या विभागात येते. सोलापूर हे सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
भूगोल : सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार चौरस किलोमीटर आहे. सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५ मिलिमीटर आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस पुणे,सांगली,सातारा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैर्ॠत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४२ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत जाते.
सोलापूर जिल्ह्यातील तालुके : नेमाडी, अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस, मोहोळ, सांगोला. सोलापूर शहर हे कर्नाटक व आताचे तेलंगण व पूर्वीचे संयुक्त आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत असल्याने येथे विविध धर्मांचे व भाषां बोलणारे लोक राहतात.
भाषा : मुख्य भाषा - मराठी, कन्नड, तेलुगू, इतर भाषा - हिंदी, गुजराती, सिंधी, पंजाबी, तामिळ, मल्याळम,उर्दू आहेत. बोली भाषा - पारधी, गोरमाटी (बंजारा किंवा लमाण), राजस्थानी, मारवाडी.
अक्कलकोट : संस्थानाचे मानचित्र अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती.पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुषा आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४ % सहा वर्षे वयाखालील मुले होती.अक्कलकोट तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ एक लाख हजार 879 हेक्टर आहे.