ETV Bharat / state

चंद्रभागा वाळवंटात महास्वच्छता अभियान; अडीच तासात ५० टनापेक्षा जास्त कचरा उचलला - जिल्हाधिकारी

पंढरपूर येथे ६ जुलै ते १७ जुलै या कालावधीमध्ये आषाढी यात्रा २०१९ संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी ७ वाजता विठ्ठल मंदिर आणि संत नामदेव समाधीसमोर महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

चंद्रभागा वाळवंटात जिल्ह्याधिकाऱ्यांची महास्वच्छता अभियान
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:36 PM IST

सोलापूर - आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरी नगरीत जिल्हा प्रशासनाने महास्वच्छता अभियान राबवून चंद्रभागा वाळवंट स्वच्छ केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे स्वत: स्वच्छता मोहिमेत उतरल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी ५० टनापेक्षा अधिक कचरा संकलन करून पंढरपूर नगरपालिकेने त्याचे व्यवस्थापन केले.

चंद्रभागा वाळवंटात जिल्ह्याधिकाऱ्यांची महास्वच्छता अभियान

पंढरपूर येथे ६ जुलै ते १७ जुलै या कालावधीमध्ये 'आषाढी यात्रा २०१९' संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने बुधवार २ जुलै रोजी सकाळी ७ वाजता विठ्ठल मंदिर आणि संत नामदेव समाधीसमोर महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आवताडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके तहसीलदार मधुकर बर्गे, जिल्हा परिषद जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सर्व कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक व पदाधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

सदर अभियानामध्ये सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. तर जिल्हा परिषदेंतर्गत ११ पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांना एक दिवसीय महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी उपस्थित होते.

पंढरपूर तालुका - मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग
माढा तालुका - चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर दगडी पुल ते उद्धव घाट
मोहोळ तालुका - चंद्रभागा नदीच्या तीरावरील ६५ एकर परिसर
सांगोला तालुका - दर्शन मंडप पत्राशेड परिसर व दर्शन बारी
मंगळवेढा तालुका - वाखरी पालखी तळ व परिसर

या तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ६ ते ९.३० या काळात महास्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

यात्रा झाल्यानंतरही महास्वच्छता अभियान राबवणार - जिल्हाधिकारी डॉ. भोसले

पंढरपूर शहरात सर्व भागात स्वच्छतेचे सातत्य टिकून रहावे, हा या अभियानाचा उद्देश आहे. किमान १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते. ५ प्रमुख ठिकाणी वारकऱ्यांची वर्दळ असते. या प्रत्येक ठिकाणी २ हजार लोक सहभागी झाले होते. तर यात्रेनंतर देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Intro:R_MH_SOL_02_JULLY_2019_PANDHARPUR_CHANDRAVHGHA_SANITATION_S_PAWAR

चंद्रभागा वाळवंटात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांची स्वछता मोहीम, स्वछतेतून अडीच तासात 50 टनापेक्षा
सोलापूर-
आषाढी यात्रेच्या पार्श्वभुमीवर पंढरी नगरीत जिल्हा प्रशासनाने महास्वच्छता अभियान राबवून चंद्रभागा वाळवंट स्वच्छ केले आहे. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले हे स्वत: स्वच्छता मोहिमेत उतरल्याने कर्मचारी यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. 50 टनापेक्षा अधिक कचरा संकलन करून पंढरपूर नगरपालिकेने त्याचे व्यवस्थापन केले. Body:पंढरपूर येथे दिनांक 6 जुलै ते 17 जुलै या कालावधीमध्ये आषाढी यात्रा 2019 संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 2 जुलै 2019 रोजी सकाळी 7 वाजता विठ्टल मंदिरा समोर संत नामदेव समाधी समोर या महा स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करणेत आला. या प्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उप जिल्हाधिकारी सचिन ढोले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आवताडे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके तहसीलदार मधुकर बर्गे जिल्हा परिषद जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सर्व कर्मचारी तसेच विविध स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक व पदाधिकारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

सदर अभियानामध्ये सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. जिल्हा परिषद अंतर्गत ११ पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व अधिकारी यांना एक दिवशीय महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी उपस्थित होते.
पंढरपूर तालुका -मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग,
माढा तालुका - चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर दगडी पुल ते उद्धव घाट,
मोहोळ तालुका -चंद्रभागा नदीच्या तीरावरील 65 एकर परिसर
सांगोला तालुका_ दर्शन मंडप पत्राशेड परिसर व दर्शन बारी
मंगळवेढा तालुका- वाखरी पालखी तळ व परिसर या नमूद केलेल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी 6 ते 9.30 या काळात महास्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

महास्वच्छता अभियान यात्रा झालेनंतर देखील राबवणार - जिल्हाधिकारी डाॅ. भोसले

पंढरपूर शहरात या निमित्ताने सर्व भागांत स्वच्छतेचे सातत्य टिकून रहावे. हा या अभियानाचा उद्देश्य असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्ग,चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर दगडी पुल ते उद्धव घाट, चंद्रभागा नदीच्या तीरावरील 65 एकर परिसर दर्शन मंडप पत्राशेड परिसर व दर्शन बारी, या प्रमुथ ठिकाणी व पालखी तळ व परिसरांत ही मोहिम राबवित आली आहे. किमान दहा हजार पेक्षा अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. ५ प्रमुख ठिकाणी वारकरी यांची वर्दळ असते. या प्रत्येक ठिकाणी २ हजार लोक सहभागी झाले होते. यात्रेनंतर देखीलस्वच्छता मोहिम राबविणेत येणार आहे. वाळवंटामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.