पंढरपूर: सध्या सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. दिवाळीच्या सण म्हणले की, फराळ आणि फटाके हे समीकरण अनेक वर्षापासून जुळून आलेले आहे. फटाके फोडणे मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. परंतु पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावांमध्ये गेल्या 6 वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त कोणतेही फटाके फोडले जात नाहीत. फटाके मुक्त गाव अशी या गावची ओळख झाली आहे.
या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण पंढरपूर तालुक्यातील चिंचणी हे गाव सातारा जिल्ह्यातून पुनर्वशीत झाले आहे. पंढरपूर पुणे रोडवरील पिराची कुरोलीच्या पुढच्या बाजूला चिंचणी हे छोटेसे गाव वसले आहे. ग्रामीण कृषी पर्यटन अंतर्गत चिंचणी या गावाने खाद्य संस्कृती जोपासले आहे. गेल्या 20 वर्षापासून या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण झाले आहेत. या गावांमध्ये चिंच, पेरू, आंबा, चक्कू, सीताफळ याची हजारो झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या गावांमध्ये प्रवेश केला असता पक्षांचा किलबिलाट कानी येतो.
एकमुखी निर्णय: 6 वर्षांपूर्वी या गावातील एक कुत्रा फटाक्याच्या आवाजाने घाबरून गेला होता. फटाक्याचा आवाज सहन न झाल्याने तो कुत्रा आपल्या मालकाच्या शेतामध्ये जाऊन मरण पावला. तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांची गावांमध्ये बैठक झाली व गावांमध्ये इथून पुढे कोणत्या प्रकारचे फटाके न फोडण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. फटाके फक्त दिवाळी पुरते समर्यादित्य न ठेवता कोणाच्याही वाढदिवसाला, सण- उत्सव स्वागताला या गावांमध्ये फटाके फोडले जात नाहीत. फटाके फोडल्यामुळे झाडांवरील जे पक्षाचे पक्षी घाबरून उडून जातात. फटक्यामुळे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण होते. यामुळे आम्ही फटाके उडवत नाही, असे या गावातील विद्यार्थ्यांनी ईटिव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.