सोलापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पाहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. अक्कलकोट येथील सांगवी खुर्द,रामपूर,आणि बोरी उमरगे व अक्कलकोट शहर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत.
![solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-chief-minister-uddhav-thackeray-will-visit-solapur-today-and-visit-flood-victims-10032_19102020072332_1910f_1603072412_835.jpg)
14 व 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बोरी नदीला महापूर आला होता. त्यामुळे नदी काठावर असलेले या तिन्ही गावातील घरे वाहून गेली आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतातील पिके तर वाहून गेली आहेत. सांगवी खुर्द व सांगवी बुद्रुक या गावांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तेथील नागरिक देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने ते नुकसानग्रस्तांना किती मदत जाहिर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.