ETV Bharat / state

उजनीतील पाण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा - प्रशांत परिचारक - bjp mla prashant paricharak

जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी संदर्भातील 22 एप्रिल रोजी सर्वेक्षणाचा आदेश रद्द केला आहे. यावरून भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी खोचक टोला लगावला आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनीतील पाण्यासंदर्भातील अध्यादेश काढला. तो आदेश राज्यातल्या इतर कोणत्याही मंत्र्याला किंवा जलसंधारण मंत्र्याला रद्द करता येतो का?', असा सवाल परिचारक यांनी केला आहे.

pandharpur
पंढरपूर
author img

By

Published : May 19, 2021, 4:05 PM IST

पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उजनीतील पाण्यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. तो अध्यादेश राज्यातल्या इतर कोणत्याही मंत्र्याला किंवा जलसंधारण मंत्र्याला रद्द करता येतो का? असा खोचक टोला सोलापूरच्या पंढरपूर येथील भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यातील खासदार व आमदारांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही आमदार परिचारक यांनी दिला आहे.

उजनीतील पाण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा- आमदार प्रशांत परिचारक

'उजनीच्या पाण्यासंदर्भातील आंदोलनाची दखल घेऊन अध्यादेश रद्द'

'जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी संदर्भातील 22 एप्रिल रोजी सर्वेक्षणाचा आदेश रद्द करत असल्याचे सांगीतले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर आदेश काढला आहे. त्याला कोणत्याही मंत्र्यांकडून असा आदेश रद्द करता येतो का? असा सवाल आहे. सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीसह इतर संघटनांनी आंदोलन केल्यामुळे जलसंपदा मंत्र्यांकडून सर्वेक्षणाचा आदेश रद्द करण्यात आला आहे. मात्र, उजनीतील पाणी उचलण्यासंदर्भाचा आदेश रद्द झालेला नाही. जोपर्यंत तो अन्यायकारक निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे', असे त्यांनी सांगितले.

'सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होणारा आदेश काढायलाच नको होता'

'उजनीचे पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी आहे. राज्य सरकारकडून अशा प्रकारे पाणी पळवून नेण्याचा अन्यायकारक आदेश काढायलाच नको होता. त्यासाठी राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आली. त्यानंतर सर्वेक्षणाचा आदेश सरकारने काढला आहे. आमचा इंदापूर तालुक्यात पाणी देण्याला विरोध नाही. मात्र ते पाणी पुणे जिल्ह्यातील धरणातून घ्यावे. त्याचे योग्य ते नियोजन करावे. आमची तशी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील सांडपाणी आडवावे व तिथे मोठा बॅरेज बांधावा आणि ते पाणी इंदापूर, दौंड, बारामतीला घ्यावे. तसे झाल्यास उजनीच्या पाण्याची गरज पडणार नाही', असेही त्यांनी म्हटले आहे.

21 मे रोजी नामदेव पायरीजवळ आमदार-खासदारांचे उपोषण होणार?

उजनीतील पाण्यासंदर्भातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे. तो निर्णय त्यांनीच रद्द करावा. अशा मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार व 2 खासदार पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील नामदेव पायरीजवळ एक दिवसीय उपोषण करणार आहेत. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.