ETV Bharat / state

Increase Milk Price : दूध दरवाढीचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी पूजेला यावे - गाईच्या दुधाला 40 रुपये

गाईच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 60 रुपयांची दरवाढ मिळावी, सरकारने दूध धोरण ठरवावे अशी मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ते आज कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Increase Milk Price
Increase Milk Price
author img

By

Published : Jun 22, 2023, 10:07 PM IST

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच आषाढी पूजेला यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. दुधाची दरवाढ न केल्यास विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल अशी, माहिती शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.

प्रतिलिटर 6 रुपये अनुदान द्यावे : राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिलिटर 6 रुपये अनुदान द्यावे. तसेच कर्नाटक, गुजरात राज्यांमध्ये दुधाला दिल्या जाणाऱ्या अनुदानाप्रमाणेच दूध धोरण राज्य सरकारने जाहीर करावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दूध संघाने दुधाचे दर कमी केले : महाराष्ट्रात दुधाचा व्यवसाय हा शेतीचा पुरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. मात्र, लंम्पी रोग आणि कोरोना-१९ साथीच्या लॉकडाऊननंतर दूध व्यवसाय तेजीत असतानाच महाराष्ट्र दूध संघाने अचानक दुधाचे दर कमी केले. एकीकडे पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय सेवांचे दर दुप्पट केले जात आहेत, तर दुसरीकडे दुधाचे प्रतिलिटर दर वाढण्याऐवजी कमी केले जात आहेत. याचे उत्तर राज्य सरकार, दूध संघाने शेतकऱ्यांना दिले पाहिजे. दुधाची मागणी वाढली असताना दूध संघ दुधाचे दर कमी करून नफेखोरी करत आहेत का? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यावेळी गाईच्या दुधाला ४० तसेच म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

एफआरपी प्रमाणे दूध धोरण जाहीर करावे : दुधासाठी एफआरपी कायदा लागू करावा, कर्नाटकच्या ‘नंदिनी’ आणि गुजरातच्या ‘अमूल’ ब्रँडच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ब्रँड तयार करावा, तसेच वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा मागण्या शिवसेनेच्या वतीने करण्यात आल्या. ना नफा ना तोट्यावर आधारित दुग्ध दूध धोरण जाहीर करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

दुध दरवाढीसाठी आंदोलन : राज्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी दूध दरवाढीसाठी गावपातळीपासून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार दूध दरवाढीची मागणी मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेत दिला इशारा : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. आषाढी वारी अगोदर दुधाचे दर वाढवण्यात यावे, अन्याथा राज्य सरकारविधोत आक्रमक आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे ,गणेश वानकर,अमर पाटील, यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी,अतुल भंवर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे ,पुजा खंदारे, संतोष केंगनाळकर, मोहसीन शेख, माणिक श्रीरामे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, अशोक भोसले आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.