ETV Bharat / state

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्याकडून निवडणूक तयारीची पाहणी - Chief Electoral Officer Shrikant Deshpande

पंढरपूर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतली. तसेच निवडणूक नियंत्रण कक्षास भेट देवून तेथील, एक खिडकी कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, निवडणूक नियंत्रण कक्ष, मतदार सहाय्यता कक्ष आदी कक्षाची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचनांचे पालन करुन कामकाज करण्याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी केल्या.

Chief Electoral Officer Shrikant Deshpande took information about the preparations of by election pandharpur
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक
author img

By

Published : Mar 20, 2021, 5:11 PM IST

पंढरपूर - १७ एप्रिलला होऊ घातलेल्या मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या कामाकाजाची प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व उपसचिव तथा सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी आ. ना. वळवी यांनी पाहणी केली.

पोटनिवडणुकीतील अनेक कक्षांची पाहणी ..
पंढरपूर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक 17 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतली तसेच निवडणूक नियंत्रण कक्षास भेट देवून तेथील, एक खिडकी कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष, निवडणूक नियंत्रण कक्ष, मतदार सहाय्यता कक्ष आदी कक्षाची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सूचनांचे पालन करुन कामकाज करण्याबाबतच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी केल्या.

मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा आव्हान..

शासकीय गोडाऊन येथील स्ट्रॉग रुम, निवडणूक साहित्य ठेवण्यात येणाऱ्या जागेची पाहणीही त्यांनी यावेळी केली. निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. यासाठी नियुक्त सर्व अधिकारी कर्मचारी आरोग्याच्या दृष्टीने आवश्यकती काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल मरोड, जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरिक्षक किरण अवचर, अरुण पवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रविवारी पंढरपूर दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.