ETV Bharat / state

विठ्ठल- रूख्माई मंदिरात चंदनउटीस प्रारंभ; उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी केली जातेय उपाययोजना - चंदनउटी

पंढरपूरच्या विठ्ठल रुख्माई मंदिरात मूर्तीला चंदनउटीचा लेप लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी ही उपाय योजना केली जाते.

विठ्ठल-रूख्माई मंदिरात चंदनउटीस प्रारंभ
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:23 PM IST

सोलापूर - पंढरपूरच्या विठ्ठल रुख्माई मंदिरात मूर्तीला चंदनउटीचा लेप लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी ही उपाय योजना केली जात असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विठ्ठल-रूख्माई मंदिरात चंदनउटीस प्रारंभ

उष्णतेची दाहकता चैत्र महिन्याच्या सुरूवातीपासूनच जाणवू लागली आहे. वाढत्या उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढरपूरच्या विठूरायाच्या चंदनउटी पूजेला पाडव्यापासून सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत मशिन देखील आणले आहे.

मूर्तीच्या चंदनउटी पूजेसाठी ७५० ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येते. आगामी तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ लक्षात घेता विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी चंदनाचा लेप विठ्ठल मूर्तीच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. याकामी लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत या चंदनउटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते. विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठ्ठलाच्यामूर्तीप्रमाणे रुक्मिणीमूर्तीस याच पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली.

Intro:R_MH_SOL_01_08_PANDHARPUR_CHANDAN_UTI_S_PAWAR
विठ्ठल- रूख्मीणीच्या चंदनउटीस प्रारंभ
उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी चंदनउटी पूजेस सुरूवात
सोलापूर-
वैशाख वणव्याची दाहकता ही चैत्र महिन्याच्या सुरूवातीपासूनच जाणवू लागली आहे. उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढरीच्या विठू रायाला चंदन उटी पूजेला पाडव्यापासून सुरूवात झाली आहे.Body:सध्या उष्णतेची दाहकता वाढत चालली आहे उष्णतेची वाढती दाहकता कमी व्हावी यासाठी श्री विठ्ठल-रूख्मीणीच्या चंदन उटी पूजेस सुरूवात करण्यात आली आहे. वैशाख वणव्याची दाहकता ही चैत्रातच जाणवू लागली आहे. त्यामुळे चैत्र महिन्यात विठुरायाच्या परंपरागत चंदन उटी पूजेलाही सुरुवात झाली. मंदिर समितीने कर्मचाऱ्यांवरील चंदन उगाळण्याचा ताण कमी करण्यासाठी अद्ययावत मशिन आणलं आहे.

देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी 750 ग्राम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येतं. पुढचे तीन महिने तीव्र उन्हाळ्याचा काळ आहे. विठुरायाला या उष्म्यापासून दिलासा मिळावा, यासाठी शीतल चंदनाचा लेप त्याच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचं चंदन मागवण्यात येतं. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदन उटीची युतीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोषाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसऱ्या दिवशी काकड आरतीच्या वेळी काढण्यात येते.
विठुरायाच्या पोषाखावेळी आता रोज ही पूजा होणार असून देवाच्या अंगावर अंगी घालण्याऐवजी चंदनाचा लेप देण्यास सुरुवात झाली आहे. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही या पद्धतीने चंदन उटी लावण्यास सुरुवात करण्यात आली.

Conclusion:बाईट:- हनुमंत ताटे (मंदिर समितीचे अधिकारी)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.