ETV Bharat / state

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या उपसरपंचासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Solapur district news

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह दहा जणांविरोधात अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमालासह पथक
जप्त मुद्देमालासह पथक
author img

By

Published : May 20, 2021, 8:08 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी पात्रातील वाळू उपसाबाबतीत पोलीस व महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते. पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील उपसरपंचासह व ग्रामपंचायत सदस्यसह दहा जणांविरुद्ध अवैध वाळू उपसाबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर विभागीय कार्यालय व तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत दोन मालवाहू चारचाकी, दोन मोटारसायकल, एक वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी बैलगाडी, असा साडेआठ लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

उपसरपंचासह दहा जणांवर गुन्हा दाखल

गाव कारभारातील प्रतिष्ठित पद असणाऱ्या उपसरपंच आणि ग्रामपंचायतील सदस्यांसह वाळू उपसाबाबतचा कोणताही परवाना नसतना चंद्रभागा नदीपात्रातून वाळू उपसा करून शासनाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यासह दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उपसरपंच विक्रम आसबे, तसेच ग्रामपंचायत सदस्य उदय पवार, स्वप्नील आसबे, सागर चव्हाण, पप्पू कोले, सागर घंटे, दीपक घंटे व इतर तीन जण, अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उपसरपंच विक्रम आसबे यास वाळूतस्करीमुळेच तडीपार करण्यात आले होते.

हेही वाचा - बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.