ETV Bharat / state

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड!

author img

By

Published : Jan 29, 2021, 6:56 AM IST

ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सहायक अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नियुक्त केल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या प्रतिनियुक्त्या दिल्याची माहिती दिली आहे.

rural hospitals due to unofficial transfers
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा भोंगळ कारभार

सोलापूर - जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा भोंगळ कारभार चहाट्यावर आला आहे. ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सहायक अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नियुक्त केल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. सिव्हील सर्जन यांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या प्रतिनियुक्त्या दिल्या आहेत.

ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी सिव्हील सर्जन कार्यालयात

मोहोळ तालुक्यात ग्रामीण रुग्णालयातील सहायक अधीक्षक गणेश धोत्रे सिव्हील सर्जन ऑफिसमध्ये इतर कामकाज पाहत असल्याने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत आहे. तर बार्शीतील सहायक अधीक्षक कुलकर्णी हे देखील सिव्हील सर्जन कार्यालयात काम पाहत आहेत. त्यामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालयात ताण वाढला आहे. तर अक्कलकोट येथे हत्तीरोग नियंत्रण केंद्रातील धीमधीमे हे अधिकारी आपली मूळ नियुक्ती सोडून सिव्हील सर्जन कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड!
वडाळा ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा रामभरोसे

वडाळा ग्रामीण रुग्णालयात लॅब असिस्टंट या पदावरील अधिकारी शिवकुमार हिरेमठ हे सुद्धा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे वडाळा येथील प्रयोगशाळा रामभरोसे सुरू आहे. सिव्हील सर्जन ऑफिसमध्ये मुळात प्रयोगशाळा सहायक (लॅब असिस्टंट) हे पदच नाही. तरीही वडाळा ग्रामीण रुग्णालयातील लॅब असिस्टंट सोलापूर सिव्हील सर्जन ऑफिसमध्ये कुणाचे रक्त तपासणी करत आहेत, असा प्रश्न पडला आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात फक्त एकच सहायक अधीक्षक पद मंजूर असताना तीन सहायक अधीक्षक कसे काय कामकाज पाहत आहेत.

वरिष्ठांच्या परवानगीने या प्रतिनियुक्त्या

ग्रामीण रुग्णालयातील सहायक अधीक्षक दर्जाचे अधिकारी सिव्हील सर्जन ऑफिसमध्ये काम करतात याबाबत विचारणाही झाली. तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी उत्तर दिले की, त्यांच्या प्रतिनियुक्त्या करण्याचा आदेश स्थानिक पातळीवर झाला आहे. याची पूर्वकल्पना वरिष्ठांना दिली आहे. पण शासन निर्णयनुसार प्रतिनियुक्त्या करण्याचा अधिकार फक्त राज्य शासनाला आणि आरोग्य संचालकांना आहे. तर स्थानिक पातळीवर याचा आदेश कसा काय पारित झाला, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

गुप्तरोग व स्किन ओपीडीतून अधिपरिचरिका गायब

पांगरी ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका शाहेदा शेख यांची बदली छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार जिल्हा रुग्णालय सोलापूर येथील गुप्तरोग व स्किन विभागात अधिपरिचारिका या पदावर झाली होती. परंतु या अधिपरिचारिका त्या विभातील ड्युटी सोडून सिव्हील सर्जन किंवा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील वैद्यकीय देयके(मेडिकल बिल) मंजुरीचा कामकाज पाहत आहेत.

औषध निर्माता अधिकाऱ्याची बदली होऊन चार महिने उलटले

औषध निर्माण अधिकारी(फार्मासिस्ट) अमीर तांबोळी यांच्या विंनंतीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये दौंड (पुणे) येथील ग्रामीण रुग्णालयात झाली आहे. तरी देखील या अधिकाऱ्याला त्याच्या बदलीच्या ठिकाणी सोडले गेले नाही. त्यामुळे दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात ताण तर वाढला आहे. पण इतर जिल्ह्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना देखील वेळेवर सोडले नसल्याने त्या जिल्ह्यात देखील रुग्णांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे सिव्हील सर्जन कार्यालयाचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

हेही वाचा - रेल्वे बजेटकडून मुंबईकरांच्या 'या' आहेत अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.