ETV Bharat / state

Cannabis Seized In Solapur : सोलापुरात पन्नास लाखांचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची मोठी कारवाई

author img

By

Published : Jul 10, 2022, 4:49 PM IST

Updated : Jul 10, 2022, 5:03 PM IST

सांगोला पोलिसांनी 43 लाख 66 हजार रुपयांचा गांजा जप्त ( Cannabis Seized In Solapur ) केला आहे. पेट्रोलिंग करताना पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या पोत्यांत पोलिसांना गांजा मिळाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल ( Filed an offense under NDPS ) केला आहे.

Cannabis Seized In Solapur
सोलापुरात पन्नास लाखांचा गांजा जप्त

सोलापूर - सोलापुरातील सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जवळपास 43 लाख 66 हजार रुपयांचा गांजा जप्त ( Cannabis Seized In Solapur ) केला आहे. पेट्रोलिंग करताना पोलिसांनी इनोव्हा कारची तपासणी केली. त्यामध्ये संशयीत आरोपींनी वेगवेगळ्या पोत्यांत गांजा भरून ठेवला होता. सांगोला पोलिसांनी इनोव्हा कार, गांजा, मोबाईल असा एकूण 55 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी संग्राम मलाप्पा पुजारी ( रा. पुसेगाव भवानी नगर, ता. खटाव जि. सातारा यास अटक केली आहे. यावर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल ( Filed an offense under NDPS ) केला आहे.याबाबत अधिकृत माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.

गांजा जप्तीप्रकरणी पोलिस निरिकक्षकांची प्रतिक्रिया

पेट्रोलिंग करताना इनोव्हा कार आढळली - सांगोला पोलिस ठाण्यातील बिट मार्शल कल्याण ढवणे, सुनील लोंढे 8 जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महुद बुद्रुक ते दिघंची जाणाऱ्या मार्गावर सांगोला रोडच्या कडेला एमएच ४३ एजे २३२७ ही सिल्व्हर रंगाची इनोवा गाडी अंधारात थांबलेली दिसली. या इनोव्हा कारच संशय आल्याने पोलिसांनी गाडी चालकास आवाज दिला. मात्र, चालकाने गाडी सुरू करत दिघंचीकडे सुसाट वेगाने धान घेतली.

पाठलाग करून इनोव्हा कार ताब्यात घेतली - पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सदरचे वाहन पकडले. त्यातील चालकाकडे नाव विचारले असता त्याने संग्राम मलाप्पा पुजारी (रा. पुसेगाव भवानी नगर, ता. खटाव, जि. सातारा, मुळ रा. मारुती नगर, मुद्देबिहाळ, ता. मुद्देबिहाळ, जि. विजापुर, राज्य-कर्नाटक) असे नाव सांगीतले. त्याच्याकडे सदर वाहनामध्ये काय आहे याबाबत विचारपूस केली असता त्यामध्ये ०९ पोती असून त्यात गांजा असल्याचे पोलिसांना सांगितले.

इनोव्हा कार मध्ये गांजाची पाकीट आढळली - पोलीस इनोव्हा कारची झडती घेतली असता प्रत्येक पोत्यांमध्ये गांजाची पॅकेट्स आढळली. इसमाच्या ताब्यात सुमारे ४३ लाख ६६ हजार ४०० रुपये किमतीचा २१८ किलो गांजा तसेच 12 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार, मोबाईल, इनोव्हा गाडीत मिळुन आलेल्या दोन वेगळ्या नंबरच्या नंबरप्लेट जप्त केल्या आहेत. याबाबत सांगोला पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. नि. अनंत कुलकर्णी हे करत आहेत.

गांजाचा तपास सुरू- संशयीत आरोपी संग्राम पुजारी याने सदर गांजा कोठुन आणला, तो कोणाला विक्री करणार होता. याबाबत माहिती घेतली जात असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली. ही कारवाई सांगोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय कल्याण ढवणे, लिंबाजी पवार, विशाल लेंडवे, राहुल कोरे, मुजावर, गणेश कुलकर्णी, सुनिल लोंढे, संभाजी काशीद यांनी केली.

हेही वाचा - Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार! सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत महिलेला तृतीयपंथीकडून मारहाण

Last Updated : Jul 10, 2022, 5:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.