ETV Bharat / state

74 year old grandmother : शिक्षणाची जिद्द! वयाच्या 75व्या वर्षी आजीबाईंनी दिली विद्यापीठाची परिक्षा - नाट्यशास्त्र विभाग

74 वर्षांच्या (74 year old grandmother) ज्या वयात काही लोक आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत असतात. त्या वयात सोलापुरच्या विद्या काळे (Vidya Kale at Solapur) यांनी, नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) नाट्यशास्त्र विभागाच्या (drama exam) द्वितीय वर्षाची परीक्षा दिली आहे. त्यांचे हे ध्येय, या वयातही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Vidya Kale of Solapur
सोलापुरच्या विद्या काळे
author img

By

Published : Aug 1, 2022, 2:09 PM IST

सोलापूर : माणूस जीवनाच्या शाळेमध्ये आयुष्यभर शिकत असतो,तर शिक्षण क्षेत्रामध्ये साधारण तो 25 ते 30 वर्षापर्यंत अभ्यास करून परीक्षा देत असतो. पण काही लोक नियमाला अपवाद असतात. सोलापुरच्या काळे बाई अशाच काही नियमाला अपवाद आहेत. विद्या काळे (Vidya Kale at Solapur) यांनी आयुष्यातले 40 वर्ष शिक्षकेची नौकरी केली. सेवानिवृत्तीनंतर पंधरा वर्षाचे आयुष्य मनासारखे जगल्या. मात्र त्यांच्यातील विद्यार्थीनी त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती. त्यामुळे वयाच्या 74 (74 year old grandmother) व्या वर्षी पुन्हा सोलापूर विद्यापीठाच्या, नाट्यशास्त्र विभागामध्ये; दुसऱ्या वर्षीच्या परीक्षा त्या देत आहेत. ज्या वयात आयुष्याची संध्याकाळ असते, त्या वयात शिकणाच्या जिद्दीची दुसरी गोष्ट म्हणजे तरुण आजी विद्या काळे. विद्या काळे यांनी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) नाट्यशास्त्र विभागाच्या (drama exam) द्वितीय वर्षाची परीक्षा दिली आहे.

लहानपणापासूनच नाट्यशास्त्राची आवड : विद्या काळे यांना सर्वजण बाई या नावाने ओळखतात. बाईंना नाट्य क्षेत्राची आवड लहानपणापासूनच होती. बाईंना कलेचा वारसा आई आणि वडिलांकडून मिळाला. बाईंचे विद्यार्थी आज उच्च पदावरती कार्यरत आहेत. त्यांनी शालेय नोकरीमध्ये नाट्य क्षेत्रांमध्ये, विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीचा फायदा, त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना मधील लॉकडाऊनच्या काळामध्ये बाईंना विरंगुळा म्हणून शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. कोरोणा काळामध्ये सर्व शिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. ज्या वयामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना दिसत नाही, वाचता येत नाही. त्या वयामध्ये बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपले शिक्षण घेत होत्या.आतापर्यंत आजीने एम. ए.बी एड, संगीत, नाट्य, क्रीडा क्षेत्रात ही चांगले यश मिळवले आहे.

शारीरिक व्याधी, तरीही शिकण्याची जिद्द : वयाच्या 75 व्या वर्षी विद्या काळे यांना शारीरिक व्याधींचा त्रास होत आहे. डोळ्याचे - हृदयाचे ऑपरेशन, रक्तदाब,अश्या व्याधी असुन, सुद्धा त्यांची शिकण्याची उमेद नक्कीच प्रेरणादायी आहे. विद्या काळे या पुढचे शिक्षण घेणार नाहीत. ज्या वयात आपल्या आयुष्याची संध्याकाळ म्हणून घेत, आपले आयुष्य रितेपणांना घालवणाऱ्या, आत्ता आपले काय राहिले? असे म्हणत आयुष्यातील शेवटचे घटक मोजणाऱ्यांना आजी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. बाई जेष्ठ नागरिकांना स्वतःला एकटे ठेवू नका, कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा सल्ला देतात. बाईंना आता पुढील आयुष्य अभ्यास करण्यात घालवायचे नाही, तर वाचनामध्ये घालवायचे आहे, अजून काहीतरी करून दाखवायचे आहे, असे ईटीव्ही शी बोलताना त्यांनी सांगितले.

हेही वाचा : PM Mann Ki Bat : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' झाला जनआंदोलन, मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.