पंढरपूर : के चंद्रशेखर राव आज पंढरपूर दौऱ्यामध्ये आले आहेत. त्यांनी विठ्ठल दर्शन घेतले आहे. ते भगीरथ भालके यांच्या जाहीर पक्ष प्रवेशासाठी सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे मोठी चर्चा महाराष्ट्रात होत आहे. ते नक्की महाराष्ट्रात कशासाठी आले आहेत, यावर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे के चंद्रशेखर राव सातत्याने महाराष्ट्रात येऊन भाजपाची बी टीम म्हणून काम करतात, अशी टीका होत आहे. यावर आता केसीआरचे नेते संतोष माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसीआर का महाराष्ट्रात येत आहे? याचे उत्तर सुद्धा त्यांनी दिलेले आहे.
विकासाचे नवीन मॉडेल : तेलंगणा राष्ट्र समितीने एक विकासाचे नवीन मॉडेल तयार केलेले आहे. भारताच्या सर्वसामान्य नागरिकांना ते जगण्यासाठी चांगले आहे. त्याचाच प्रसार करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आमचे सगळे मंत्री, आमदार विठ्ठलाच्या दर्शनाला येणे ही काही चूक नाही. आमच्या विकासाचे मॉडेल आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. जनता आम्हाला स्वीकारेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे राष्ट्र समितीचे नेते संतोष माने यांनी म्हटले आहे. ृअनेक मोठे नेते आमच्याकडे पक्षप्रवेशासाठी येत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी आमची बातचीत चालू आहे. परंतु, आणखी अंतिम टप्प्यात आलेली नाही. परंतु काही मुद्द्यांवरती आम्ही चर्चा करत आहोत. यावर लवकर मार्ग निघेल असे, केसीआर शेतकरी नेते यांनी म्हटलेले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये वाटा : खरंतर काल केसीआर यांनी उमरगा येथे नॉनव्हेज खाल्ल्याने हिंदू राष्ट्र समितीने त्यांना विठ्ठलाचे दर्शन देऊ नये, असा इशारा दिला होता. त्यावर बोलताना संतोष माने म्हणाले, की नॉनव्हेज काल खाल्ले होते. आपण रोज उठल्यानंतर आंघोळ करतो, टीका करायची म्हणून करायची नाही. आम्ही कुणाचीही बी टीम नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी विरोधात किंवा सत्तेत असेच असतो. गुजरातमध्ये गेलो तर ते काँग्रेसची बी टीम म्हणतात. महाराष्ट्रात आलो तर ते भाजपाची बी टीम म्हणतात. त्यामुळे आम्ही स्वतंत्र चालणार आणि सत्तेत येण्याइतके आमदाराने खासदार आमचे महाराष्ट्रात निवडून येतील, एवढी तयारी आम्ही केलेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आम्हाला वाटा निश्चित मिळेल, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- KCR Maharashtra Visit: केसीआर यांनी विठ्ठलाचे घेतले दर्शन, थोड्याच वेळात भगीरथ भालके यांचा होणार बीआरएसमध्ये पक्षप्रवेश
- KCR in Pandharpur: केसीआर यांचा शेकडो गाड्यांचा ताफा विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना
- KCR Maharashtra visit : राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर; के चंद्रशेखर राव यांनी घेतली काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची भेट