सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून 33 लाख 40 हजार किमंतीचा अवैध विदेशी दारुसाठा जप्त केला आहे. एवढा मोठा विदेशी साठा हरियाणाहून सोलापूरपर्यंत कसा आला याचा तपास सुरू आहे. कोणालाही संशय येऊ नये यासाठी दोघा संशयितांनी वाहनात भंगार सामान ठेवले होते. दोघेही पंजाब येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा - राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न
याबाबत सविस्तर वृत्त असे, तिऱ्हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला होता. त्यावेळी एक संशयित मालमोटार (एच आर 55 क्यू 3067) दिसली. त्यांनी मालमोटारीला अडवून तपासणी केली अशता त्यात 400 पेट्या अवैध विदेशी दारु आढळली. दारू व मालमोटार, असा एकूण 33 लाख 40 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच वाहन चालक रामसिंग निरवाईलसिंग आणि सहचालक काला इंदरसिगं (दोघे रा. पंजाब) या दोघांना अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारू दिसू नये म्हणून वाहनात ठेवले होते भंगार साहित्य
हरियाणामधून प्रवास करत हा विदेशी मद्यसाठा घेऊन दोघे मालमोटारीलतून सोलापुरातील तिऱ्हे गावापर्यंत आले होते. कुणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी भंगार साहित्य देखील मोटारीत ठेवले होते. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनातील भंगार बाजूला काढत तपासणी केली असात त्या ठिकाणी मद्यसाठा सापडला.
हेही वाचा - भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षाविरोधात सावकारीचा गुन्हा दाखल
हेही वाचा - राज्य शिक्षण समितीवर रणजितसिंह डिसले अन् कादर शेख यांची निवड