ETV Bharat / state

कोरोनाविरुद्ध लढण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी; सोलापूर भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - solapur bjp agitation

अवघा देश कोरोना संकटाविरुद्ध एकजुटीने लढत असताना पीपीई कीट, कोविड- १९ हॉस्पिटल निर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन निश्चित आणि प्रभावी योजना करण्यातील नियोजन शून्यतेमुळे आणि महाराष्ट्रातील नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यूदर वाढला असल्याचा आरोप सोलापूर भाजपने केला आहे.

covid 19 crisis
कोरोनाविरुद्ध लढण्यात ठाकरे सरकार सपशेल अपयशी; सोलापूर भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
author img

By

Published : May 19, 2020, 11:19 PM IST

सोलापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. राज्यातील सरकार हे कोरोनाच्या महामारीत उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजी राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे आमदार सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरच्या महापौर श्रीकांचन्ना यन्नम, भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.

विक्रम देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष

अवघा देश कोरोना संकटाविरुद्ध एकजुटीने लढत असताना पीपीई किट, कोविड- १९ हॉस्पिटल निर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मदत घेऊन निश्चित व प्रभावी योजना करण्यातील नियोजन शून्यतेमुळे आणि महाराष्ट्रातील नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यूदर वाढला आहे. तसेच कोरोनावार उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचे भाजपच्या वतीने म्हटले आहे.

परप्रांतीय आणि महाराष्ट्रातील स्थलांतरितांसाठी योग्य साधन सुविधा उभी करण्यात, सातत्याने बदलणारे निर्णय, केंद्र सरकारशी समन्वयाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. केंद्र सरकारची भरघोस मदत असतानाही परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. या भीषण संकटातसुद्धा स्वतःच्या आमदारकीची आणि मतपेटीची काळजी घेण्यात सरकार इतके आंधळे झाले आहे की, पोलीसांवर दिवसेंदिवस वाढत चाललेले हल्ले त्यांना दिसेनासे झाले आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

कोरोना संकटातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली असून या सर्वसामान्य नागरिकांना यातून सावरण्यासाठी राज्य सरकारणे विशेष आर्थिक पॅकेज घोषित करावे. यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या सूचनेनुसार सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेत सोलापूर भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.