ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यावर शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या भाजप नेत्याला फासले काळे - Pandharpur news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या पंढरपूर भाजप माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांना पंढरपूर शिवसैनिकांनी तोंडाला काळे फासले.

शिवसैनिकांनी भाजप नेत्याला फासले काळे
शिवसैनिकांनी भाजप नेत्याला फासले काळे
author img

By

Published : Feb 6, 2021, 8:28 PM IST

पंढरपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या पंढरपूर भाजप माजी अध्यक्ष शिरीष कटेकर यांना पंढरपूर शिवसैनिकांनी तोंडाला काळे फासले. विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी ते पश्चिम द्वार पर्यंत काटकर यांची धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

शिवसैनिकांनी भाजप नेत्याला फासले काळे

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ भाषेचा वापर-

5 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका ही केली.

कटकर यांना शिवसैनिकांचा चोप-

याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑइल ओतून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. त्यांची नामदेव पायरी ते पश्चिम द्वार अशी धिंड काढण्यात आली. कटेकर यांच्या हातात बांगड्या, हार, बुक्का लावून या वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडून करण्यात आला.

हेही वाचा- आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.