ETV Bharat / state

Chitra Wagh : अशा मला 56 नोटीसा आल्या, तुमच्या नोटीसींना मी घाबरत नाही - चित्रा वाघ - Urfi Javed case

भाजपनेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी रविवारी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांच्या नोटीसाला प्रतिउत्तर दिले आहे. मला अशा 56 नोटिसा आल्या आहेत, त्याला मी घाबरत नाही. अशा कडक शब्दात चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद प्रकरणावरुन ( Urfi Javed case ) रुपाली चाकणकरांवर निशाना साधला ( Chitra Wagh criticizes Rupali Chakankar ) आहे.

Chitra Wagh
चित्रा वाघ
author img

By

Published : Jan 8, 2023, 7:23 PM IST

Updated : Jan 8, 2023, 11:00 PM IST

अशा मला 56 नोटीसा, तुमच्या नोटीसींना मी घाबरत नाही - चित्रा वाघ

सोलापूर - महाराष्ट्र राज्यात हे चालणार नाही,असे त्या म्हणाल्या.महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नोटीस पाठविली आहे,त्यावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे, मला अशा 56 नोटिसा आल्या आहेत. त्यात काही विशेष नाही, त्याला आम्ही उत्तर दिलं आहे. महिला अयोगात या एकट्या नाहीत असे म्हणत चित्रा वाघ ( Chitra Wagh criticizes Rupali Chakankar ) बरसल्या. त्यांना दिलेलं उत्तर ही महिला आयोगाने प्रसिद्ध करावं असं चित्रा वाघ म्हणाल्या.

बाईचा कान टोचा - सुप्रिया सुळेंनी देखील या वादात उडी घेत चित्रा वाघ यांवर बोलले होते,त्याबाबत चित्रा वाघ यांनी परखड मत मांडत,रुपाली चकणकर या बाष्कळ विधान बोलत आहेत,त्यांना सांगा. सुप्रिया सुळेंना मान्य आहे का? रस्त्यावर नंगा नाच सुरू असलेल. आमची भूमिका हे आहे की,उर्फी जावेदच हे नंगा नाच आम्ही मान्य करणार नाही. राज्यात सुरू असलेल्या गलिच्छ राजकारणावर त्यांनी संधान साधत अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली राज्यामध्ये सैराचार नंगानाच सुरू असून या विरोधात बोललले तर नोटीस पाठवता ही कसली पद्धत.पहिल्यांदा आपल्या बाईचे कान टोचा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असे सांगताना विरोधकांसह महिला आयोगावर देखील टिकास्त्र सोडले.

भाजप सरकार फिल्डवर काम करणार सरकार - राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे अत्यंत जोमाने काम करत आहे. राज्यातील सरकार ऑनलाईन नसून ऑनफिल्डवर असल्याचे ठासून सांगितले. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री हे फिल्डवर आहेत,राज्यातील मंत्रिमंडळ हे मंत्रालयात दिसणार नाही.मागच्या सरकारला ऑनलाइन,फेसबुकलाइव्ह याचीच सवय आहे.

पहिल्यांदाच पुरुषाकडे महिला बालकल्याण मंत्रायल - आमच्या कडे तीन ते चार महिला आमदार आहेत. पण या सरकार मध्ये पहिल्यांदाच पुरुषाकडे महिला बालकल्याण खाते आले आहे. त्यांनाही कळू द्या महिलांच्या समस्या काय असतात असे, चित्रा वाघ म्हणाल्या. शिंदे फडणवीस सरकारमध्ये येत्या काळात तीन ते चार महिलांना संधी मिळेल.

अजित पवारांची भूमीका आवडली - अजित पवारांची भूमिका मला आवडली, कारण त्यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटलं की, हे महिला महिलांचा सुरू आहे. आता त्यांच्या पक्षातील महिलांना कळावे की, संधीच सोनं करावं की, माती. अजित दादांना कळलं आहे इथं माती होत चालली आहे.

Last Updated : Jan 8, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.