ETV Bharat / state

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे 'समाधान', 3 हजार 733 मतांनी आवताडे विजयी - Samadhan Autade news

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे 1 लाख 9 हजार 450 मत घेऊन विजयी झाले आहेत. निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे (महाविकास आघाडी) भगीरथ भारत भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. समाधान अवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत.

आवताडे
आवताडे
author img

By

Published : May 2, 2021, 8:20 PM IST

Updated : May 2, 2021, 8:37 PM IST

सोलापूर (पंढरपूर) - पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे 1 लाख 9 हजार 450 मत घेऊन विजयी झाले आहेत. निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे (महाविकास आघाडी) भगीरथ भारत भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मते मिळाली. समाधान अवताडे हे 3 हजार 733 मतांनी विजयी झाले आहेत. यामधील शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैलजा गोडसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील त्या दोघांना मिळून अडीच हजारांच्या आसपास मते मिळाली आहेत. या मतदारसंघात एकूण 2 लाख 27 हजार 421 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

समाधान आवताडे यांना पंढरपुरातून आघाडी तर मंगळवेढ्यातून पिछाडी

पंढरपूर शहर व तालुक्यातून भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना एक हजार मतांची आघाडी मिळाली तर मंगळवेढा शहरातून समाधान आवताडे यांना साडेचार हजार मतांची पिछाडी असल्याचे दिसून आले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे विजयी झाले आहे. मात्र, पंढरपूर शहर व तालुक्यातील गेल्या निवडणुकीत दिवंगत आमदार भारत भालके यांना सुमारे साडेसहा हजार मतांची आघाडी होती. त्यामुळे भगीरथ भालके पंढरपूरमधून आघाडी मिळेल असे वाटत होते. मात्र, समाधान आवताडे यांना एक हजार मतांची आघाडी पंढरपूर शहरातून मिळाली आहे. आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीचा फायदा समाधान आवताडे यांना झाल्याचे दिसून आला.

विकासकामांना देणार प्राधान्य

भाजपचे समाधान आवताडे विजयानंतर बोलताना म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील कमी प्रमाणात मते मिळाली आहेत. पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचीत आमदार समाधान आवताडे यांनी केले.

राज्यात लवकरच होणार सत्तांतर

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मतदारसंघावर भाजपने झेंडा फडकविला आहेत. यामुळे राज्यात लवकरच सत्तांतर होण्याची भाकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे. उजनीच्या पाणी प्रश्नाबाबत सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या तिजोरीची चावी फक्त बारामतीसाठीच उघडते, अशी खोचक टीकाही रणजितसिंह निंबाळकर यांनी केली.

सुधाकरपंत परिचारक यांच्या आशीर्वादाने विजय

आमदार संजय शिंदे यांनी जे ठरवले होते तेच घडले आहे, अशी मिश्कील टिप्पणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या आशीर्वादाने आजचा विजय झाला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेतील मतदार व कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचे परिचारक म्हणाले.

हेही वाचा - पंढरपूरमध्ये भगीरथ भालकेंचा पराभव म्हणजे महाविकास आघाडीचे अपयश- आमदार रवी राणा

Last Updated : May 2, 2021, 8:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.