पंढरपूर (सोलापूर) - राज्यात विविध जिल्ह्यात पसरलेला बर्ड फ्लू जिल्ह्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण, मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्म हाऊस मधील 9 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचे तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
राज्यात परभणी व लातूर या ठिकाणी बर्ड फ्लू दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममधील नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू सदृश्य रोगाने झाल्याचे निश्चित झाले आहे.
जिल्हाप्रशासनाकडून जंगलगी गाव प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर-
मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबड्यांची नियमित तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंज शंभरकर यांनी काढले आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून जंगलगीपासून दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच जंगलगी गाव हे प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी काढले आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सात दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा-बर्डफ्लूचा धोका वाढलने एका रात्रीत 10 हजारहून अधिक कोंबड्या नष्ट
- जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून हे दिले आदेश-
कोंबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी. - कुकुट पालकांनी मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्षांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी.
- जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुक्कुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी.
हेही वाचा-'बर्ड फ्लू'ला घाबरु नका, चिकन शिजवून खा - पालकमंत्री
कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचे सावट राज्यात पसरले आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू पसरला आहे.