सोलापूर - शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेकापचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख व पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन रुपनर यांचे नाव जाहीर केले.
भाऊसाहेब रुपनर हे सांगोला तालुक्यात मेडसिंगीचे रहिवासी असून, ते उच्च शिक्षित आहेत. त्यांचा फॅबटेक नावाचा मोठा उद्योग समुह तसेच शिक्षण संस्थाही आहेत.
हेही वाचा गांधीजयंतीला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीची घोषणा
गेल्या ५० वर्षांपासून सांगोला हा एकमेव मतदारसंघ शेकापच्या ताब्यात आहे. आमदार गणपतराव देशमुख यांनी सलग अकरा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांची ख्याती आहे. परंतु, 93 वर्षे वय असल्याने त्यांना पुढील निवडणूक लढवणे शक्य नाही. यामुळे सांगोल्यासाठी पक्षाने दुसरा उमेदवार बघावा, असे यापूर्वीच सांगण्यात येत होते.
हेही वाचा आघाडीमधील जागा वाटपाचा विषय लवकरच मार्गी लागेल - शेकाप
त्यानुसार पक्षाने पञकार परिषद घेऊन भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा केली.