सोलापूर - आज देशाचा ७३ वा स्वातंत्र्यदिन देशभर उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली. देवाचा गाभारा, चौखांभी मंडप , सोलखंभी मंडपामध्ये आकर्षक तिरंगी फुलाची सजावट करण्यात आली आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज स्वातंत्र्यदिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली. भगव्या, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या पाना फुलांनी तिंरग्यात ही सजावट करण्यात आली. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे रुप अधिकच खुलून दिसत होते. आज पहाटेपासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.