ETV Bharat / state

काव्या मला माफ कर... इंजिनिअर तरुणाची सोलापुरात आत्महत्या - engineer suicide solapur

बंगळुरू येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या सॉफ्टवेअर इंजनिअरचा गळफास घेतलेल्या अवस्थेतेतील मृतदेह सापडला होता. सोलापूर शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कूमठे गावातील शिवारात उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता.

मृत मधू बाबू साने
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:39 PM IST

Updated : Oct 12, 2019, 11:49 PM IST

सोलापूर - 'काव्या मला माफ कर' असे म्हणत नोकरी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोलापुरात आत्महत्या केली आहे. मधू बाबू साने असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. सोलापूर शहराजवळ असलेल्या कुमठे गावाच्या शिवारातील शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता.

सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने सोलापुरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मधू बाबू साने हा बंगळुरू येथील कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. मागील 30 तारखेला तो गुटूंर येथे सासरवाडीला गेला होता. सासूरवाडीतून तो गायब झाल्याची तक्रार गुटूंर शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती. मधू बाबू साने हा हरवला असल्याची तक्रार गुंटूर पोलिसात दाखल झालेली असताना त्याचा मृतदेह एका उजाड शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाडाला लटकलेल्या अवस्थेतच होता.

हेही वाचा - सोलापूर : कुमठे गावात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह

ज्या ठिकाणी मृतदेह सापडला आहे, ती जागा वनखात्याची आहे. वनखात्याची जागा असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी जात नाही. आज सकाळी पोलीस मुख्यालयाला फोन करून कळविण्यात आल्यानंतर झाडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह मिळाला. या मृतदेहा जवळ असलेल्या बॅगमध्ये असलेल्या कागदपत्रावरून आणि आधारकार्डवरून हा मृतदेह मधू बाबू साने यांचा असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली होती. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा नंबर लावून त्यांना कळवण्यात आले. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत होता असल्याने तो सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा शिवसेनेला पाठिंबा; शेकापचा बालेकिल्ला धोक्यात

Intro:काव्या मला माफ कर म्हणत नोकरी गेलेल्या इंजिनिअरची सोलापूरात आत्महत्या

सोलापूर-
काव्या मला माफ कर असे म्हणत नोकरी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर ने सोलापूरात आत्महत्या केली आहे. सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या कुमठे गावाच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बंगलोर येथील एका नामांकित कंपनी मध्ये नोकरी ला असलेल्या आत्महत्या केलेल्या इंजिनिअर चे नाव मधु बाबू साने अस आहे.

Body:मधुबाबु साने 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर बेंगलोर येथील एका नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर काम करत आहे चांगल्या पगाराची नोकरी असलेल्या मधुबाबु साने या सॉफ्टवेअर इंजिनियर ला कंपनीने एका महिन्याच्या आत नोकरी सोडण्याचे सूचना दिल्या होत्या नोकरी गेल्यामुळे चरितार्थ चालवायचा कसा या विवंचनेत असलेल्या सॉफ्टवेअर इंजीनियर ने सोलापुरात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मधुबाबु स्नेहा मूळचा आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील कंबम्ब गावचा रहिवासी आहे. तो सध्या बेंगलोर येथील एका नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअरच्या टीम मध्ये काम करत होता कंपनीने त्याला एक महिन्याची नोटीस देऊन कंपनीतून काढून टाकण्यात येत असल्याचे सांगितले होते नोकरी गेल्यामुळे तो तणावाखाली होता दसऱ्यासाठी आपल्या बायको मुलांसह गुंटूर येथे सासरवाडीत आला होता आपल्या पत्नीला व मुलांना आपण पण कुठेतरी देवाला जाऊ असे म्हणून कपड्याची बॅग भरायला लावली आणि आणि वेळी मला बंगलोरला महत्त्वाचे काम आहे असे सांगून मधुबाबु स्नेहा मागील बारा दिवसांपासून गुंटुर येथून बेपत्ता होता त्यानंतर सांगली कुटुंबियांनी गुंटूर पोलिसात मधुबाबु हरवला असल्याची तक्रार देखील दिली होती.
सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या कुमटे गावाच्या हद्दीमध्ये वन विभागाची जमीन आहे या वन विभागाच्या जमिनीमध्ये सोलापूर शहर पोलिसांना एक मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी जाऊन घटनास्थळी पाहणी केली असता हा मृतदेह सात दिवसापेक्षा जास्त गळफास घेऊन पडला असल्याचे लक्षात आले ते बाजूला असलेले कागदपत्र वरून हा मृतदेह मधुबाबु साने यांचा असल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी साने कुटुंबियांना संपर्क केल्यानंतर हा मृतदेह मधुबाबु साने असल्याचं समोर आले आहे.
आयटी कंपनीमध्ये असलेली चांगली नोकरी गेल्यामुळे तणावाखाली असलेल्या मधुबाबु साने यांनी आत्महत्या केली असल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी इटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

Conclusion:नोट- या अगोदर सकाळी या संदर्भातील बातमी पाठवली होती त्या बातमी मध्ये एक व्हिडिओ आणि दोन फोटो पाठवलेले आहेत मधुबाबु साने यांचा तो फोटो या बातमीत वापरला तरी चालेल तसेच अगोदर वापरलेला व्हिडिओदेखील वापरावा ही विनंती सोबत दोन बाई आणि एक व्हिडीओ ची फाईल जोडले आहे.
Last Updated : Oct 12, 2019, 11:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.