करमाळा (सोलापूर) - केळीच्या दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली आहे. करमाळा तालुक्यातील दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगली मागणी आहे. संचारबंदीच्या काळातही येथील केळी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर येथे मोठ्या प्रमाणात पाठवण्यात येत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
सोलापूर : करमाळ्यातील केळीला उत्तर भारतातून मोठी मागणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद होत्या, ग्राहक नव्हते शिवाय जिल्हा बंदीची सक्त अंमलबजावणीमुळे केळीची मागणी घटली होती. यामुळे दरात घसरण झाल्याने केळी उत्पादक संकटात सापडला होता. पण, रमजान मासारंभ झाल्याने केळीची मागणी वाढली आहे. कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिखलठाण, वांगी या भागातून 400 टन केळी उत्तरप्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मु काश्मीर येथे पाठवली जात आहे. केळीचे दर मागील आठवड्यात 4 ते 5 रुपये किलो होते. पण, रमजानमुळे देशभरातून केळीची मागणी वाढली आहे. प्रामुख्याने उत्तरेकडून केळीची मोठी मागणी आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून 7 ते 8 रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहेत. यामुळे केळी उत्पादकातून उत्साहाचे वातावरण पसरले आहे.हेही वाचा - करमाळ्यात उत्तरेश्वर पेट्रोलियमच्या वतीने 501 कुटूंबाना किराणा किट