करमाळा (सोलापूर) - करमाळा शहरातील जामा मशिदीतून दिवसातून पाच वेळा स्पीकरवरून आजानसह कोरोनाविषयक जनजागृती केली जात आहे. जामा मशिदीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांना आपल्या घरामध्ये नमाज पठण करण्याबरोबरच आताच्या परिस्थितीत आपण कशाप्रकारे जबाबदारी पार पाडली पाहिजे याविषयी आवाहन केले जात आहे.
देशात व राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन वेताळ पेठेतील जामा मशिदमधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जामा मस्जिदमध्ये दिवसातून पाच वेळा आजनच्या वेळी शहरातील सर्व नागरिकांना स्पीकरवरून कोरोनाचा धोका पाहता घराबाहेर पडू नका, नमाज पठनासाठी मशिदीत येऊ नका, आपापल्या घरीच नमाज पठण करा, सतत हात धुत रहा, मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर ठेवा, असे संदेश देण्यात येत आहे.
जामा मशिदीचे विश्वस्त कासम सय्यद, उस्मान सय्यद, जमीर सय्यद, मौलाना मोहसीन हे सामजिक सलोखा कायम राहावा यासाठी विविध उपक्रम रावबतात.
जामा मशिदीचा सर्वांनी आदर्श घ्यावा
जामा मशिदीच्या या उपक्रमाविषयी बोलताना करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले की, जामा मशिदीचा आदर्श सर्व धार्मिक स्थळांनी आदर्श घेतला पाहिजे. आपली सामाजिक जबाबदारी म्हणून समाज बांधवांनी घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत मिळत आहे.
हेही वाचा - 'जय महाराष्ट्र'कडून तीनशे जणांना मोफत शिवभोजन थाळीचे वाटप, रुग्णांसाठी मुस्लीम तरुणांचीही सेवा