ETV Bharat / state

अतुल खुपसेंनी संजय शिंदेंवर केलेला 'तो' आरोप खोटा..? राजकीय फायद्यासाठी आरोप केल्याची चर्चा - khupse

लोकसभा निवडणुकीत अतुल खुपसे यांनी भाजपचा प्रचार केला. त्यामुळे राजकीय वैरापोटी शिंदे यांनी हल्ला केला असा आरोप खुपसेंनी केला. खुपसे यांच्या घराला आग लागल्याचा प्रकार काही दिवसांपूर्व घडला होता.

अतुल खुपसे यांच्या घराला लागलेली आग
author img

By

Published : Apr 28, 2019, 12:08 PM IST

सोलापूर - प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल खुपसे यांनी माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी हल्ला केल्याचा आरोप केला होता. पण, हा आरोप खोटा असून खुपसे यांचा दुसऱयाच कुटुंबासोबत शेतीचा वाद होता. या वादातूनच हाणामारीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे झालेल्या मारहाणीचा खुपसे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.

टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक

लोकसभा निवडणुकीत अतुल खुपसे यांनी भाजपचा प्रचार केला. त्यामुळे राजकीय वैरापोटी शिंदे यांनी हल्ला केला असा आरोप खुपसेंनी केला. खुपसे यांच्या घराला आग लागल्याचा प्रकार काही दिवसांपूर्व घडला होता. पण, त्यांना झालेली मारहाण जमिनीच्या वादातून झाल्याचे सांगितले जात आहे. अतुल खुपसे यांनी त्यांच्या गावातील डांगे कुटुंबाची जमीन कराराने कसण्यासाठी घेतली होती. पण, खुपसे यांनी त्या जमिनीवर कब्जा केला. ही बाब समजल्यानंतर डांगे कुटुंबाने खुपसेंविरोधात पोलिसात तक्रार केली. दरम्यान खुपसेंच्या घराला आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही.

यात्रेनिमीत्त गावात आलेल्या डांगे कुटुंबाने स्वतःच्या शेतात जाऊन खुपसे कुटुंबाचे तेथील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वाद वाढत गेल्यामुळे दोन्हा कुटुंबात हाणामारी झाली. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परस्परांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात अतुल खुपसे, शोभा गायकवाड,शरद सपाटे,ज्ञानेश्वर घोरपडे,शाहीद मुलानी,रविकिरण गायकवाड, गणेश चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Intro:R_MH_SOL_01_28_ATUL_KHUPASE_BANAV_S_PAWAR_
प्रहारच्या अतुल खुपसेचा बनाव उघड,
शेतजमीनीचा वाद असतांना राजकीय आरोप
सोलापूर-
बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल खुपसे यांनी राजकीय हल्ल्याचा केलेला बनाव उघड झाला आहे. माढ्यातील राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी खुपसे यांच्या घरावर हल्ला करून घर पेटवून दिल्याची तक्रार दिली होती. अतुल खूपसे यांनी शिंदे बंधूच्या विरोधात तक्रार दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकार शेतीच्या वादातून झालेला असल्याचे टेंभूर्णी पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात परस्पर विरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतांना त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. घडलेली सर्व घटना ही मोबाईल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेली आहे. Body:लोकसभा निवडणूकीत भाजपाचा प्रचार केल्याच्या कारणावरून आपल्या वस्तीवर हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप अतुल खुपसे यांनी केला असला तरी प्रत्यक्षात हा सर्व प्रकार जमीनीच्या वादातून घडला असल्याचे समोर आले आहे. अतुल खुपसे यांनी गावातील डांगे कुटूंबाची जमीन ही कराराने कसण्यासाठी घेतली होती. 2008 साली 17 एकर जमीन ही कराराने घेतली होती. डांगे कुटूंबीय हे पुण्यात रहायला असल्यामुळे त्यांनी अतुल खुपसे यांना ही जमीन कराराने दिली होती.मात्र खुपसे यांनी या जमीनीवर कब्जा केला आहे. अतुल खुपसे हे जमीन सोडायला तयार नाहीत. डांगे कुटूंबीय हे कष्ट करण्यासाठी पुण्यात गेलेले आहेत. जमीनीवर कब्जा केल्याच्या संदर्भात 24 जानेवारी रोजी रतन डांगे यांनी पोलिसांत तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे.
उपळवटे गावातील यात्रा असल्यामुळे डांगे कुटूंबीय हे गावात आले होते. डांगे कुटूंबातील काही सदस्यांनी वस्तीवर जाऊन शेतातील सामान बाहेर काढण्यासाठी भांडण केले. यानंतर या दोन कुटूंबाद हाणामारीचा झालेला सर्व प्रकारात मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. हा सर्व प्रकार शेतीच्या वादातून झालेला असतांना अतुल खुपसे यांनी या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याचा केलेला प्रयत्न उघडकीस आला आहे. हा प्रकार शेत जमीनीच्या वादातून घडला असून परस्पर विरोधात गून्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती टेंभूर्णी पोलिसांनी दिली आहे.

माढा तालूक्यातील उपळवटे येथील अतुल खूपसे यांच्या वस्तीवर हल्ला करून घर पेटवून देण्याचा प्रकार काल घडला. या प्रकरणात अतुल खूपसे यांनी माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी घर पेटवून देऊन हल्ला केला असल्याची तक्रार सोलापूरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे दिली होती.
अतुल खुपसे हे बच्चू कडू यांच्या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. मागील दोन वर्षापासून खुपसे यांनी सोलापूर जिल्ह्यात आणि विशेष करून करमाळा तालूक्यात अनेक आंदोलन केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत अतुल खुपसे हे करमाळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर वस्तीवर झालेल्या घटनेचा राजकीय फायदा उठविण्यासाठी अतुल खुपसे यांनी या प्रकरणात माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि आमदार बबन शिंदे यांचे नांव गोवण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप संजय शिंदे यांनी केला आहे.

या प्रकरणात अतुल खुपसे, शोभा गायकवाड,शरद सपाटे,ज्ञानेश्वर घोरपडे,शाहीद मुलानी,रविकिरण गायकवाड, गणेश चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Conclusion:बाईट- पोलिस निरिक्षक, टेंंभूर्णी पोलिस स्टेशन

सोबत प्रत्यक्ष घटना कशी घडली या संदर्भातील व्हीडीओ सोबत जोडले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.