माढा ( सोलापूर ) - उपळाई ( खुर्द ) गावचे सरपंच तथा बबनराव शिंदे शुगर्सचे कार्यकारी संचालक संदीप वसंतराव पाटील यांच्यावर गावठी पिस्टलने फायरिंगचा प्रयत्न झाला. आनंद बारबोले, असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - पंढरपुरात जावेद हबीब यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
मेव्हण्यावर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या भारतीय सैन्य दलातील सैनिकाने संदीप पाटील यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टलने फायरिंगचा प्रयत्न केला. मात्र, पिस्टलमधून फायरिंग झाली नाही. संदीप पाटील यांच्या घरासमोर शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. आनंद शिवाजी बारबोले यांच्याकडून हा प्रकार घडला. या प्रकरणी संदीप पाटील यानी पोलिसात तक्रार दिली असून आनंद बारबोले यांच्यासह त्यांच्या समवेत असलेल्या त्यांची पत्नी, सासू, 2 मेव्हणे व आज सासू अशा एकूण 6 जणांवर 307 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
आनंद बारबोले सध्या १७ डिसेंबर २०२१ ते १९ जानेवारी २०२२ या कालावधित सुट्टीवर गावी दारफळ येथे आला होता. माढा पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा हे करीत आहेत.
प्रमोद जाधव हा आनंद बारबोले यांचा मेव्हणा आहे. प्रमोद यांच्यावर बबनराव शिंदे शुगर्स (केवड ता.माढा) येथून डिझेल चोरी करीत असल्याचा आरोप झाला होता. याच कारणावरून गुरुवारी सायंकाळी कारखान्यातील कर्मचारी व प्रमोद यांच्यात बाचाबाची झाली होती. मेव्हण्यावर डिझेल चोरीचा खोटा आरोप का केला? असा जाब विचारायला गेलेला बारबोले याला राग अनावर झाला आणि त्याने संदीप पाटील यांच्या दिशेने गावठी पिस्टलमधून फायरिंगचा प्रयत्न झाला. मात्र, गोळी फायर झाली नाही. घटना सुदैवाने टळली. तसेच ३ संशयित महिला आरोपी व प्रमोद यांनी संदीप पाटील यांच्या भावकीतील किरण पाटील, समाधान पाटील या दोघांना लाकडी दांडक्याने, लाथा बुक्याने मारहाण देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीने त्याच्या मेव्हण्यावर डिझेल चोरीचा खोटा आरोप केल्याचा राग मनात धरून रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. त्याच्याकडे विना परवाना पिस्टल कुठून आले? याचा आम्ही शोध घेत आहोत. आरोपी अटकेत असून त्याची कसून चौकशी केला जाईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा यांनी सांगितले.
हेही वाचा - Anil Parab on ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही - परिवहनमंत्री अनिल परब