ETV Bharat / state

Ashadhi Wari 2022 : पंढरपुरात भेसळयुक्त दीडशे किलो पेढ्याचा प्रसाद जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - पंढरपुरात भेसळयुक्त दीडशे किलो पेढ्याचा प्रसाद जप्त

विठ्ठल मंदिराजवळील ( Ashadhi Wari 2022 ) प्रसादाच्या पेढ्यावर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 150 किलो प्रसादासाठी उपलब्ध असलेला पेढा जप्त करून सदर दुकान सील करण्यात आले ( Food And Drug Department Action Against 150 Kg Prasad ) आहे.

Food And Drug Department Action Against 150 Kg Prasad

author img

By

Published : Jul 8, 2022, 8:35 PM IST

पंढरपूर ( सोलापूर ) - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आषाढी वारीच्या ( Ashadhi Wari 2022 ) अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन कडक लक्ष ठेवून आहे. विठ्ठल मंदिराजवळील प्रसादाच्या पेढ्यावर कारवाई करण्यात आली आहे. आषाढी वारीत आलेल्या भक्तांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल, असे प्रसाद विक्रीस उपलब्ध असल्याचा संशय आल्याने ताबडतोब तपासणी करण्यात आली. जवळपास 150 किलो प्रसादासाठी उपलब्ध असलेला पेढा जप्त करून सदर दुकान सील करण्यात आले ( Food And Drug Department Action Against 150 Kg Prasad ) आहे.

सदर पेढ्यात स्टार्च हे पदार्थ आढळून आले - सिंहगड कॉलेज, पंढरपूर येथील अन्न सुरक्षा स्वयंसेवक व अन्न व औषध प्रशासन, सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर व उमेश भुसे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. विठ्ठल मंदिर येथील पश्चिम द्वार, येथील पिरगौडा शिवपत्र कोट्टली यांच्या प्रसाद पेढीची तपासणी केली. सदर पेढ्यात घटनास्थळीच आयोडीन टाकून पाहण्यात आले. त्या पेढ्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. सदर पेढ्याचे ३ अनौपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित 150 किलो साठा, जप्त करण्यात आला.

भेसळयुक्त पेढ्यावर कारवाई करताना अधिकारी

पंढरपूर येथे गुन्हा दाखल - अन्न व औषध प्रशासन विभागाने सदर पेढा व प्रसाद भेसळ युक्त असल्याने जागेवर नष्ट केला. या प्रकरणी दुकानदारवर भा. द.वी. कलम 272 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे चालू आहे. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, यु. एस. भुसे यांनी सिंहगड कॉलेजच्या अन्न सुरक्षा स्वयंसेवकांसोबत पुर्ण केली.

हेही वाचा - Paddy Procurement Corruption : भंडाऱ्यात भ्रष्टाचाराचा नवा विक्रम, 6 तासांत केली 6 लक्ष क्विंटल धानाची खरेदी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.