पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त पंढरीत पालखी सोहळा दाखल झालेला आहे. त्या पालखी सोहळ्यामध्ये ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्याप्रमाणेच एक सर्वसामान्य वारकरी म्हणून लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झाले आहेत. दरवर्षी पायी दिंडी करणारे उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे नेते संजय उर्फ बंडू जाधव परभणी जिल्ह्याचे खासदार असलेले हे देखील दरवर्षी सहभागी होतात. मात्र, यावर्षी आत्तापर्यंतच्या पालखी दिंडी सोहळ्यात कितीही त्रास झाला नाही, इतका त्रास या प्रशासनाने वारकऱ्यांना केलेला आहे. वारकऱ्यांचे हाल सरकारकडून करण्यात आलेले आहेत. वारकऱ्यांना सुख सुविधा देणे गरजेचे होते, परंतु मुख्यमंत्री मात्र जाहिरीतबाजीमध्ये दंग आहेत. याचे दुःख वाटते, अशी प्रतिक्रिया खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिलेली आहे.
वारी सोहळ्यासारखा आनंद कुठेच नाही. बाजीराव विहिरीवरले रिंगण हा सर्वोच्च परमानंदाचा क्षण असतो. तो अनुभवण्यासाठीच मी गेल्या 27 वर्षापासून वारी करत आहे. - खासदार संजय उर्फ बंडू जाधव
सरकार जाहिरातीत मग्न : पालखी महामार्ग सहा पदरी झाला आहे. परंतु या मार्गावर चालताना वारकऱ्यांना यापूर्वी कधीही न झालेला उन्हाचा त्रास झाला. या ठिकाणी जर राहूट्या असत्या, झाडे लावले असते तर वारकऱ्यांना सुख सुविधा मिळाल्या असत्या. त्या मुख्यमंत्र्यांना लोकांनी आशीर्वाद दिले असते, परंतु तसे झाले नाही. करोडो रुपये या सगळ्या जाहिरातीवर खर्च करायचा, त्यातला अर्धा जर मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या सुख सुविधेसाठी खर्च केला असता तर वारकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात होते. पण, सरकार जाहिरातीत मग्न असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिलेली आहे.
सगळी जाहिरातबाजी सुरू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून चांगले व्यक्ती आहेत. पुढील मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रार्थना करणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा येईल. या सरकारने मात्र शेतकरी, कष्टकरी, रोजगार यांचे हाल केलेले आहेत. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी हे सगळे चालू आहे. सगळी जाहिरातबाजी सुरू आहे. केसीआर याने 600 गाड्या आणल्या. त्यावर सुद्धा बोलताना 600 गाड्याला परवानगी दिली कोणी? असा प्रश्न सुद्धा बंडु जाधव यांनी विचारलेला आहे.
हेही वाचा :