ETV Bharat / state

सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

author img

By

Published : Jun 21, 2020, 4:09 PM IST

सोलापूरचे चित्रकार सचिन खरात यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या चित्राच्या विक्रीतून आलेल्या पैशांपैकी 10 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे त्यांनी 10 हजार रुपयाचा धनादेश जमा केला आहे.

चित्रकार सचिन खरात यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

सोलापूर - आतंतराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात काढलेल्या चित्राच्या ऑनलाईन विक्रीतून आलेल्या पैशातील काही वाटा त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. त्यांनी 10 हजार रुपयाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला केली आहे.

सोलापुरातील चित्रकार सचिन खरात हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले चित्रकार आहेत. खरात यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या चित्राच्या विक्रीतून आलेल्या पैशांपैकी 10 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे त्यांनी 10 हजार रुपयाचा धनादेश जमा केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामध्ये सचिन खरात यांचा सोलापुरातील आर्ट स्टूडिओदेखील बंद होता. मागील तीन महिन्याच्या काळात त्यांच्या आर्ट स्टूडिओत चित्र काढायचे काम बंद असले तरी त्यांनी घरी बसून काही चित्रे काढली आहेत. कोरोना काळात काढलेल्या चित्राची त्यांनी ऑनलाईन विक्री केली आणि या विक्रीतून आलेली रक्कमेपैकी काही रक्कम त्यांनी कोरोनाच्या महामारीसाठी लढण्यास मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.