ETV Bharat / state

'राहिलेले वृक्षकोष, मत्स्यकोष सोलापुरात बसून पूर्ण करणार' - अरण्यऋषी मारुती चितमपल्ली सोलापूर आगमन

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे आज (मंगळवारी) सोलापूरात आगमन झाले. यावेळी यावेळी चितमपल्ली यांनी आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

Aranyarishi maruti chitampalli
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली
author img

By

Published : Oct 13, 2020, 10:06 PM IST

सोलापूर - राहिलेले वृक्षकोष आणि मत्स्यकोष सोलापूरात बसून पूर्ण करणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिली. चितमपल्ली यांचे मंगळवारी सोलापूरात आगमन झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांची भेटण्यासाठी रांग लागली होती. यावेळी चितमपल्ली यांनी आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. 45 वर्षापूर्वी सोलापूर सोडले होते. आता पुन्हा सोलापुरात परत आल्याने आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

याबाबत बोलताना अरण्यऋषी मारुती चितमपल्ली.

चितमपल्ली यावेळी म्हणाले, सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चितमपल्ली यांचा अरण्यऋषीपर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. प्रथम गुरू आई होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले. माझ्या आईला अरण्याचा भरपूर अभ्यास होता. आईमुळे जंगलाकडे आकर्षित झालो. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईकडून ऐकले. लिंबा मामा हे त्यांच्या आयुष्यातील दुसरे अरण्यगुरू होते. सुगरण पक्षाची घरटी पहिल्यांदा दाखवली. तर हणमंत मामा यांनीही अरण्याचे वेगळे जग दाखवले. पाखरांची नावे हणमंत मामाने सांगितली. हणमंत मामांनी सापांविषयी भरपूर ज्ञान दिले. त्यांनी असंख्य अशा वन्य प्राण्यांच्या नावे सांगितली. त्यामुळे वन खात्यात नोकरी करताना याचा भरपूर उपयोग झाला.

आदिवासींच्या सानिध्यात राहून अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी एक लाख शब्दांची भर घातली आहे. एका तेलगू भाषिक व्यक्तीने वनस्पती आणि पक्षी शास्त्राला अनेक नवे शब्द दिले, जे आजही वापरात आले आहेत. 2006साली सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षदेखील होते. मारुती चितमपल्ली पुनःश्च माहेरी आल्याची वार्ता ऐकताच सोलापूरकरांचा उर भरून आला आहे. आपला लेखक आपल्याला मिळाला, अशी भावना सोलापुरवासियांनी व्यक्त केली.

वन खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात वात्सव्य केले होते. मात्र, मायभूमीची ओढ त्यांना जास्त दिवस वर्धा येथे राहू दिली नाही. यानंतर पुतणे श्रीकांत चितमपल्ली यांच्या चितमपल्ली यांना त्यांचे शेवटचे दिवस सोलापुरात घालवावे, अशी विनवणी केली. यानंतर चितमपल्ली सोलापुरात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.