सोलापूर - शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या कृषी कन्येला आपल्या बापाचं दु:ख पहावले नाही. त्याच दुःखाच्या वेदनेने बचत गटाच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या महिला ऍग्रो प्रोड्युसर फार्मर कंपनीला जन्म दिला. आज त्या कंपनीचा आवाका एवढा वाढला की सर्वच घटकातील महिलांच्या हजारो हातांना बळ देण्याचे काम उभे राहिले. ती कृषी कन्या आहे, सोलापूर जिल्ह्यातील बोरामणीच्या अनिता माळगे. यशस्विनी ऍग्रो प्रोड्युसर फार्मर कंपनीच्या अध्यक्षा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमांत थेट अनितांशी संवाद साधला. त्याच अनितांच्या कामाचा आजच्या महिला दिनी आढावा सांगणारी ही यशोगाथा.
हेही वाचा - महिला दिन विशेष: मराठी भाषेच्या उन्नतीसाठी बंगाली महिलेचा पुढाकार; काय केलं ते वाचा सविस्तर....
त्यांच्या या कामाला बोरामणी आणि परिसरातील 16 गावातील 1300 कष्टकरी महिला आणि शेतकऱ्यांनी मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे या भागाचा आर्थिक कायापालट झाला आहे. अशिक्षित महिलांना जगाचे भान यावे म्हणून अनिता त्यांना निरनिराळ्या शासकीय विभागांच्या मदतीने आपला माल विकण्यासाठी आणि नवी बाजारपेठ पाहण्यासाठी राज्यासह देशभरातील प्रदर्शनांना पाठवितात. त्याचबरोबर त्यांच्यासाठी सहली, अभ्यास दौरे आयोजित करतात. यामागे 'स्त्री' सक्षमीकरण हेच उद्दीष्ट आहे.
हेही वाचा - #WomensDay: वेल्डिंगच्या व्यवसायात 'ति'ने उमटविला आपला वेगळा ठसा