सोलापूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आज (रविवार) दुपारी 4 वाजता अमित शाह सोलापुरात येणार आहेत. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेचा समारोप या सभेमध्ये करण्यात येणार आहे.
हे ही वाचा - भाजपात प्रवेश केला म्हणजे तिकीट मिळेलच असे नाही; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप आज रविवारी सायंकाळी सोलापुरातील पार्क मैदानावर पार पडणार आहे. मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला अमित शाह यांच्यासह राज्यातील इतर मंत्र्यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
हे ही वाचा - मुख्यमंत्र्यांची घोषणा जुनीच मात्र, नव्या जोमात; लातुरात चर्चेला उधाण
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनिती आखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू करण्यात आली होती. १ ऑगस्टला अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून या यात्रेस प्रारंभ झाला होता.