ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : सोलापूर शहरात येणाऱ्या दाहीदिशा बंद - सोलापूर शहर पोलीस

सध्या कोरोनाचा एकच रुग्ण सोलापूर जिल्ह्या आढळला नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोलापुरात कोणीही येऊ शकत नाही.

बंद केलेल्या सीमा
बंद केलेल्या सीमा
author img

By

Published : Apr 11, 2020, 4:09 PM IST

Updated : Apr 11, 2020, 6:21 PM IST

सोलापूर - शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरील सीमा सील (बंद) करण्यात आल्या आहेत. सर्व सीमांवर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. बाहेरून शहरात येण्यासाठी एकूण 10 रस्ते आहेत. या दहाही रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरुन विनाकारण कोणालाही शहरात येऊ दिले जात नाही.

सोलापूर शहरात येणाऱ्या दाहीदिशा बंद

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. देशात आणि राज्यात टाळेबंदी झाली आहे. लॉकडाऊनचा निर्णय होण्यापूर्वीच सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी केलेल्या नियोजनामुळे शहर व जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या आटोक्यात राहिली. योग्य नियोजनामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर देखील मोठया प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सर्व बाजुंच्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात बाहेरून कोणीही ही विनाकारण येऊ नये. यासाठी शहरांमध्ये येणाऱ्या दहाही रस्त्यांच्या सीमा सील करुन त्या ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून सर्व ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचे काम सर्वोत्कृष्ट - सुशीलकुमार शिंदे

Last Updated : Apr 11, 2020, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.