सोलापूर - बेकायदेशीर दारू विक्री करणारे लमाण तांडे हे दारू मुक्त करण्याची किमया अध्यात्मिक गुरूंनी साधली आहे. निंबाळ मठाचे मठाधिपती मौन तपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामी यांनी दुधणी शहराजवळ असलेल्या 4 लमाण तांड्यावरील संपूर्ण दारू विक्री थांबवली आहे. स्वामीजींच्या पुढाकारातून 4 लमाण तांडे दारूमुक्त झाले आहेत.
समाज व्यसनमुक्त झाला तरच समाजाची प्रगती होत असते. व्यसनमुक्त समाज करण्यासाठी सुरुवातीला ज्या ठिकाणी व्यसनाधिनतेचे प्रमाण जास्त आहे, तिथूनच व्यसनमुक्तीची चळवळ सुरू करावी, या उद्देशाने निंबाळ येथील शांतलिंगेश्वर वीरक्त मठाचे पीठाधिपती मौन तपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी पुढाकार घेतला.
हेही वाचा - ६३ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : माऊली जमदाडे, अक्षय मंगवडे करणार सोलापूरचं प्रतिनिधित्व
आजच्या आधुनिक युगातही समाजावर अध्यात्माचा मोठा पगडा आहे आणि अध्यात्मिक गुरुंनी एखाद्या समाजाच्या हिताचे काम हाती घेतले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. याचे उत्तम उदाहरण दुधनी जवळच्या या 4 तांड्यावर पाहायला मिळाले. शांतलिंगेश्वर वीरक्त मठाचे मठाधिपती मौन तपस्वी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी दुधनी शहराजवळील गांधीनगर लमाण तांडा, शिवाजीनगर लमाण तांडा, तसेच म्हेत्रे नगर-1 व दोन लमाण तांडा अशा 4 लमाण तांड्यावरील दारू मुक्तीचा निर्धार केला. या चारही लमाण तांड्यावर अध्यात्मिक कार्य करत असताना महास्वामीजींनी व्यसनमुक्तीचे सामाजिक कार्य देखील हाती घेतले. स्वामीजींनी घेतलेल्या या व्यसनमुक्तीच्या कार्यात चारही लमाण तांड्यावरील बंजारा समाजाच्या लोकांनी सहभागी होत व्यसनमुक्तीचा निर्धार केला.
जडी शांत लिंगेश्वर महास्वामीजी यांनी 1 वर्षभरापूर्वी दुधनी जवळील या चार्लमांट आंब्यावर व्यसनमुक्ती सुरू केली. एक वर्षापासून या चारही लमान तांड्यावर दारूचा एक थेंबही विकला गेला नाही. तसेच गावातील कोणीही मागील 1 वर्षात दारू पिलेली नाही.
हेही वाचा - हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी
लमाण तांडा म्हटले की, त्याठिकाणी दारू पिणे आणि दारूची विक्री हे समीकरण मागील कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागात पाहायला मिळते. मात्र, स्वामींनी हे 4 लमाण तांडे व्यसनमुक्त केले आहेत.